Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशतुम्हालाही बूस्टर डोस घ्यायचा? माहितीसाठी 'इथे' क्लिक करा

तुम्हालाही बूस्टर डोस घ्यायचा? माहितीसाठी ‘इथे’ क्लिक करा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशभरात १० जानेवारीपासून आरोग्यसेवा कर्मचारी (Health workers), फ्रंटलाइन वर्कर्स (Frontline workers) आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा नागरिकांना बूस्टर डोस (Booster dose) देण्यात येणार आहे. या बूस्टर डोससाठी कोविनवर (CoWin) नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे….

- Advertisement -

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) सांगितले आहे की, आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेले नागरिक ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात (Vaccination Center) जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.

ऑनलाईन अपॉइंटमेंट सुविधा सुरू झाली असून शेड्युल आज ८ जानेवारी रोजी प्रकाशित केले जाईल. प्रत्यक्ष लसीकरण १० जानेवारीपासून सुरु होईल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी लसीचा बूस्टर डोस देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. नागरिकांना ज्या लसीचे (Vaccine) दोन डोस पूर्वी घेतले असतील, त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जावा, अशा सूचना केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या