Thursday, May 2, 2024
Homeनाशिकओबीसी बचावसाठी 'आरक्षण पे चर्चा’

ओबीसी बचावसाठी ‘आरक्षण पे चर्चा’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओबीसी आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली आहे….

- Advertisement -

भुजबळ फार्म येथील कार्यालयात समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, संतोष डोमे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर व या उपक्रमाचे समन्वयक योगेश कमोद यांच्या अध्यक्षतेखाली शहर व जिल्ह्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, वार्ड व प्रभाग निहाय ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ या उपक्रमाचे समन्वयक म्हणून योगेश कमोद यांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्व संयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे.

सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सुमारे ५० हजाराहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थामधील जागा कमी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद्यांवर ओबीसी समाजातील जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

समता परिषदेचे पदाधिकारी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची तसेच ओबीसी संघटना व सर्व ओबीसी समाजातील समाज बांधवांच्या भेटी घेऊन चर्चा करणार करणार आहे.

या उपक्रमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार तसेच ओबीसी समाजाच्या विविध पदांवर कार्यरत असलेल्या आजी माजी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, वार्ड व प्रभाग निहाय बैठका घेणार आहे.

ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी समाजबांधवांची एकत्रित मोट बांधणार आहे.

उपक्रमाच्या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी ओबीसी समाज बांधवांची भेट घेतल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक येथे ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ मेळावा आयोजित करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या