Friday, July 19, 2024
Homeनगरशिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमी दाम्पत्याला आयुष्यभरासाठी आले अपंगत्व

शिर्डी पाळणा दुर्घटनेतील जखमी दाम्पत्याला आयुष्यभरासाठी आले अपंगत्व

शिर्डी | प्रतिनिधी

- Advertisement -

शिर्डी येथे श्री रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स प्रकाराचा पाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये तिन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

जखमींना तातडीने शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र यातील एकाची प्रकृती गंभीर व चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर शनिवारी रात्री डॉक्टरांनी उशिरापर्यंत ऑपरेशन करून त्याचे दोनही पाय काढण्यात आले व त्याचे प्राण वाचविले. त्यांच्या पत्नीला नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविले असून त्यांचाही एक पाय शस्रक्रिया करताना काढण्यात आला.

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

त्यामुळे हे दोनही दाम्पत्य आयुष्यभराचे अपंग झाले आहे. ही घटना शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डी शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच रामनवमीनिमित्त शिर्डी शहरात प्रसादालया समोरील मैदानात भरलेल्या यात्रेत स्थानिक ग्रामस्थ व साई भक्तांची मोठी गर्दीमुळे शनिवारी आठच्या सुमारास या यात्रेतील ब्रेक डान्स प्रकारच्या पाळण्यात बसून अनेक ग्रामस्थ व भाविक सहपरिवार आनंद लुटत असतानाच पाळणा तुटून पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले.

Congress च्या ‘लोकशाही वाचवा’ कार्यक्रमादरम्यान नेत्यांसह स्टेज अचानक कोसळला… Video Viral

या अपघातात शिर्डीतील साळवे पती-पत्नीला डोक्याला व पायाला मार लागला होता. तसेच या घटनेत दोन मुली व एक पुरुष सुद्धा जखमी झाले आहेत. पाळणा तुटल्यानंतर यात्रेतील नागरिकांची एकच धांदल व मोठी धावपळ उडाली होती. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. जखमींना तातडीने संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले.

रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक व उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे हे तातडीने अपघात कक्षात दाखल झाले. त्यांनी रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या. डॉ. खुराणा, डॉ. प्रशांत गोंदकर, डॉ. राजु तलवार, डॉ. समीर पारखे यांनी तातडीने रूग्णांवर उपचार सुरू केले. शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी व नंतर रूग्णालयात धाव घेतली.

साईबाबांवरील प्रश्नावर बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “गीदड की खाल…”

त्यानंतर यात्रेतील पाळणे बंद करण्यात आले. शिर्डीतील साळवे दाम्पत्य सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांच्यावर आलेल्या ह्या संकटामुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहे. ही दुर्घटना केवळ पाळणा चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झाल्याच निदर्शनास येत आहे.

या घटनेतील दोषी पाळणा धारक यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा सुरू आहे. या घटने प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या