Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकपालकमंत्री भुसेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

पालकमंत्री भुसेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी; पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपीटीसह अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी अधिकार्‍यांना दिले.

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादा भुसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या (Farmers) पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी भुसेंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.

Nashik News : नाशकात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

तसेच ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा (Crop insurance) काढला असेल, त्या शेतकर्‍यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. याशिवाय कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी शेतकर्‍यांना अश्वासित केले.

दरम्यान, यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जायकवाडीसाठी गंगापूरमधून विसर्ग सुरु

निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाला पालकमंत्र्यांची भेट

पालखेड मिरचिचे | वार्ताहर | Palkhed Mirchiche

निफाड तालुक्यात काल दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी दाटुन येऊन वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास काही क्षणात निसर्गाने हिरावून घेतला. यात द्राक्ष उत्पादकांसह कांदा व इतर पिकांचे उत्पादन घेणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे…

लाखो रुपयांचे कर्ज काढून उभे केलेले द्राक्षपिक अगदी क्षणात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने संपूर्ण ‘द्राक्षपंढरी’ हादरून गेली आहे. पोटच्या पोराप्रमाणे जीव लावलेल्या पिकाची अशी क्षणात वाताहात होणे ही मनाला सुन्न करणारी घटना काल निफाड तालुक्यात घडली. निसर्गापुढे हतबल झालेल्या गारपीटग्रस्तांना धीर देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम यांच्यासह आदी प्रशाकीय अधिकाऱ्यांनी निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील संतोष देवराम भंडारे,भारत राजाराम मोगल यांच्या द्राक्षबागांची तर महेश भंडारे यांच्या कांदा पिकाची पाहणी करत इतर घटनास्थळी धाव घेतली.

शेतकऱ्यांनी या काळात धीर धरून स्व:ताला सावरावे अशी विनंती या लोकप्रतिनिधींनी केली. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करत तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, असे अश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. तर गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करत शासनाकडे तात्काळ अहवाल पाठवण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

- Advertisment -

ताज्या बातम्या