Wednesday, January 7, 2026
Homeक्राईममुलींच्या छेडछाडीसाठी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ

मुलींच्या छेडछाडीसाठी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ

श्रीरामपूरच्या दोघांवर कारवाई

लोणी |वार्ताहर| Loni

शनिवारी श्रीरामपूर येथून दोन तरुण लोणी परिसरात आले होते. त्यांनी एक व्हिडीओ तयार करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यात ते मुलींची टिंगलटवाळी करत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूरवरून लोणी येथील कॉलेजला आलेल्या मुलींची टिंगलटवाळी करण्यासाठी आल्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसून आले. त्यांचा उद्देश फक्त मुलींची छेड काढणे हा असल्याचे इंस्टाग्रामवरील व्हिडिओवरून दिसल्यावर पोलिसांनी या दोघा तरुणांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली. शाहिद हुसेन शेख (वय 21) व सात हशम सय्यद (वय 20) दोघे रा. वॉर्ड नबर 1, श्रीरामपूर, या आरोपींविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर नंबर 548/2025 कलम भारतीय दंड संहिता 62, 79 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112, 117 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

YouTube video player

दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हे करत आहेत. दोघेही आरोपींचे मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी आपल्या बेकायदेशीर वर्तनाची माफी मागितली असून त्याबाबतचा व्हिडिओही सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. लोणी हे राज्यातील मोठे शैक्षणिक केंद्र आहे. येथे राज्यातून आणि देशाच्या अनेक भागातून हजारो मुली शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आहेत.

त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शिक्षण संस्थेची असल्याने लोणीत याकडे गांभीर्याने पाहिले जाते. लोणी ग्रामस्थही जागरूकपणे लक्ष ठेवून असतात. बाहेरगावचे तरुण लोणीत येऊन अशाप्रकारे मुलींना त्रास देत असतील, तर पोलिसांबरोबरच शिक्षण संस्था आणि ग्रामस्थ त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पोलीस विभागाकडून सोशल मीडिया अर्थात फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम यावर प्रसारित होणार्‍या विविध पोस्टवर लक्ष ठेवले जात असून जर कोणी अशा प्रकारे गैरवर्तन करून आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करत आहेत. महिला, मुली यांच्याशी संबंधित गैरप्रकार करणार्‍यांवर गंभीर कारवाई करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलींनी असे कोणाकडूनही गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
– सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधिक्षक

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...