Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण - क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदांचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून सन २०२५ मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने क्रीडा विभागाकडून राज्यातील दीड लाख गोविंदाना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिली.

- Advertisement -

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना क्रीडामंत्री भरणे म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याकरिता अंदाजे 1 कोटी 25 लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल. सन २०२३ व २०२४ मध्ये प्रत्येकी ७५ हजार गोविंदांना ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमासंरक्षण देण्यात आले होते. यावर्षी गोविंदांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दहीहंडीमध्ये मनोरे रचताना तरुणांनी आपले काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री भरणे यांनी यावेळी केले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...