Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशUnion Budget 2023 : अर्थसंकल्पाबद्दलच्या 'या' इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Union Budget 2023 : अर्थसंकल्पाबद्दलच्या ‘या’ इंट्रेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. दरवर्षी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकार सहसा पुढील आर्थिक वर्षातील प्रमुख आर्थिक योजना असतात. वेगवेगळ्या विकासकामांसाठी वेगवेगळ्या मंत्रालयांना निधी दिला जातो.

पण या सर्व गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला एकतर माहित असतील किंवा तुम्ही त्या आरामात कुठेतरी वाचल्याही, पण आज आम्ही तुम्हाला अर्थसंकल्पाशी संबंधित अशीच काही रंजक माहिती सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसेल.

- Advertisement -

अर्थसंकल्प म्हणजे…

ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. आर्थिक धोरणे जाहीर होणाऱ्य़ा संकल्पास अर्थसंकल्प म्हटले जाते. प्रत्येक देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायत देखील आपला अर्थसंकल्प सादर करत असते. या सादर होणाऱ्य़ा अर्थसंकल्पात निधी, खर्च, लेखे, तूट, मागण्या, विनीयोजन याचे आर्थिक नियोजनाची रूपरेषा सादर केली जाते.

डॉक्टरांची कमाल! मेंदूमधून चक्क दगड काढला… वाचा ऑपरेशनची थरारक स्टोरी

पहिला भारतीय अर्थसंकल्प

पहिला भारतीय अर्थसंकल्प हा ७ एप्रिल १८६० साली सुरू झाला. तेव्हा हा अर्थसंकल्प ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीतर्फे सादर करण्यात आला होता. १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश संसदेचे ईस्ट इंडिया कंपनीच्या कामावर नियंत्रण आले. अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा आर के शन्मुखम शेट्टी यांनी २६, नोव्हेंबर, १९४७ संसदेत सादर केला होता. तसेच १९९१-९२ मध्ये अंतिम आणि अंतरिम अर्थसंकल्प वेगवेगळ्या पक्षांच्या दोन अर्थमंत्र्यांनी सादर केला. यशवंत सिंह यांनी अंतरिम बजेट संसदेत मांडला. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी सादर केला होता.

गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कॉन्सर्ट दरम्यानच घडला सारा प्रकार

मोरारजी देसाई यांना सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला

मोरारजी देसाई ज्यावेळी अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान होते, त्यावेळी सर्वात जास्त १० वेळा बजेट सादर करण्याचा मान यांना मिळाला. यामध्ये पाच वार्षिक आणि त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात एक अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी तीन अंतिम आणि १ अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पाचे प्रिंटींग एक आठवडा अगोदर होते पूर्ण

अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्याच्या एक आठवडा अगोदर त्याचे प्रिंटींग पूर्ण होते. अर्थसंकल्पाचे पेपर हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. अर्थसंकल्प तयार करणारी टीम दहा दिवसांपासून कैद असते. त्यांना मंत्रालयाबाहेर, अगदी त्यांच्या घरीही जाऊ दिले जात नाही. एवढेच काय तर त्यांना काही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास हॉस्पिटलमध्ये जाण्याची देखील परवानगी नसते.

‘प्रेमपुजारी’ला ५० वर्ष पुर्ण, आपल्या नगर जिल्ह्याशी आहे खास आठवणी

अर्थसंकल्प बनवण्याच्या काळात मंत्रालयात मोबाईल नेटवर्क काम करत नाही

अर्थसंकल्प तयार केली जाण्याची प्रक्रिया सुरु होण्याच्या सुरुवातीपासून ते संसदेत सादर होईपर्यंत, अर्थ मंत्रालयातील गुप्तचर विभागाच्या सायबर सुरक्षा सेलद्वारे सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जाते. या काळात मंत्रालयात मोबाईल नेटवर्क काम करत नाही. लँडलाइन फोनवरूनच संभाषण करावे लागते. देशाच्या आर्थिक आरोग्याशी संबंधित कोणतीही छोटी-मोठी माहिती लीक होऊ नये यासाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जाते. त्यामुळेच या महत्त्वाच्या कामातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेरच्या जगापासून दूर ठेवून कडक निगराणी केली जाते.

१० दिवसांसाठी वित्त मंत्रालयात सर्व आवश्यक सुविधांसह डॉक्टरांची टीम तैनात

या १० दिवसांसाठी वित्त मंत्रालयात सर्व आवश्यक सुविधांसह डॉक्टरांची टीम तैनात असते. कारण कोणताही कर्मचारी आजारी पडला तर त्याच जागेवर त्याला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येऊ शकतील. आजारी कर्मचाऱ्याला १० दिवस रुग्णालयात उपचार घेण्यासही मनाई केली जाते. देशाचा अर्थसंकल्प तयार करणे ही काही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. ज्यामुळे देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती पूर्णपणे गोपनीय राहते.

ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला! खोट्या प्रतिष्ठेपायी कुटुंबाने लेकीला संपवलं

इंटरनेट आणि NIC सर्व्हर डिलिंक केले जाते

अर्थसंकल्प तयार करताना गेल्या १० दिवसांत इंटरनेट वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या कॉम्प्यूटरवर बजेट संबंधित कागदपत्र आहेत त्या तिथून इंटरनेट आणि NIC सर्व्हर डिलिंक केले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगची भीती राहत नाही. हे कॉम्प्यूटर केवळ प्रिंटर आणि प्रिंटिंग मशीनशी जोडलेले असतात. अर्थ मंत्रालयाच्या ज्या भागात प्रिंटिंग प्रेस आहे, तिथे निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच जाण्याची परवानगी आहे.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या