Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : क्रेडाई सदस्यांचे प्रकल्प अधिक सुरक्षित आणि लाभदायी; पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप

Video : क्रेडाई सदस्यांचे प्रकल्प अधिक सुरक्षित आणि लाभदायी; पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप

क्रेडाई शेल्टर-2019 गृहप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्याच दिवशी या गृहप्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. वेगेवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर याठिकाणी भेटी देत असून घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी अनेकांनी कालपासूनच घरांची बुकिंग सुरु केली आहे. कालपासून शेकडो घरांची बुकिंग पूर्ण झाली असून प्रचंड प्रतिसाद या गृहप्रदर्शनाला लाभला आहे.

क्रेडाईचे पदाधिकारी उमेश वानखेडे, रवी महाजन आणि सुनील कोतवाल यांच्याशी साधलेला संवाद

क्रेडाई आयोजित शेल्टर प्रदर्शन दोन वर्षातून एकदा याप्रमाणे भरवले जाते. यामध्ये क्रेडाई सदस्यांचे स्टॉल आहेत. नाशिकसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, नंदुरबार, धुळ्यातून नाशिकमध्ये येणार्‍या आणि घर खरेदी करणार्‍यांना प्रॉपर्टीची माहिती नसते. त्यासाठी हे प्रदर्शन के्रडाई नाशिकतर्फे भरवले जाते. तसेच नाशिककर नागरिकांनाही यातून घराच्या खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध होतात. 15 लाखांपासून ते 2 कोटीपर्यंत घरांचे पर्याय यंदाच्या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

शिवाय घरकर्ज देणार्‍या बँकाही येथे तत्काळ उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना एकाच छताखाली फ्लॅट, बंगला, प्लॉट, औद्योगिक प्लॉट, फार्म हाऊस तसेच गुंतवणुकीसाठी काही स्थावर मालमत्तांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

नाशिकम्हणून जे काही वैशिष्ट आहेत त्यांना सादर करण्यासाठी वॉव ही संकल्पना आहे. म्हणजे येथील शेती व्यवसाय, धार्मिक नगरी, शिक्षणाची नगरी येथील वेगळेपण हे वॉव नाशिक संकल्पनेत येणार आहे. आणि नॉऊ नाशिकमध्ये या संकल्पनेत नजिकच्या भविष्यातील नाशिक कसे विस्तारणार आहे यांच्यावर भाष्य करण्यात येत आहे.

म्हणजे कृषीप्रधान जिल्हा, फळांची नगरी हे वॉवमधून प्रदर्शनास भेट देणार्‍या लोकांना सांगणार असून ‘नाऊ नाशिक’मध्ये फळ प्रक्रिया उद्योगाचे भविष्य येथील संधी, रोजगार यावर पूढील योजना, विकास यावर सांगितले जाईल एकूणच वॉव नाशिक नाऊ नाशिक ही परस्परपूरक संकल्पना आहे ज्यातून नाशिकचे देशभर ब्रॅडिंग करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

क्रेडाई नॅशलन, क्रेडाई नाशिक मेट्रो आणि क्रेडाई महाराष्ट्र कौशल्य विकास उपक्रमावर नेहमीच भर देत असते. त्या अनुषंगाने कामगारांना प्रशिक्षित दिले गेले. बांधकाम मजूर, प्लंबर, फरशीकाम करणारे, ड्रायव्हर यांच्यापासून ते क्रेडाईचे सदस्य, बांधकाम व्यावसायिक यांच्यातील कौशल्य विकासावर के्रडाई अत्यंत चांगले काम करत आहे.

भारतात ‘क्रेडाई’तर्फे सामाजिक काम म्हणून जितक्या कामगारांना देशभरात प्रशिक्षण दिले त्यामध्ये 70 टक्के कौशल्य विकासाचा वाटा केवळ क्रेडाई नाशिक मेट्रोचा आहे. यासह क्रेडाई नाशिकने नेहमीच धरणांमधील गाळ काढणे, दुष्कळग्रस्त गावांना मदत करणे, टँकर पुरवणे हे आणि अशा सामाजिक कार्यात पुढाकार घेत असते.

यंदाच्या प्रदर्शनात मजूर वर्गाला बिल्डर्सच्या सुविधेसाठी लेबर नोंदणी उपक्रम राबवला असून साईटवर यापूर्वीच10 हजार श्रमिकांनी नोंदणी केली आहे.आता प्रदर्शनात त्यांना मोफत स्टॉल लावण्याची परवाणगी आम्ही दिली असून त्याच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत. यासह नागरिकांसाठी मोफत व्याख्याने, चर्चासत्रे, माहितीपर कार्यक्रम आयोजित केली आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, एमआयडीसी आणि स्मार्ट सिटी यांना प्रर्दशनात मोफत स्टॉल उपलब्ध करून देणार आहोत. त्यामाध्यमातून या संस्था नाशिकच्या पर्यटन, उद्योग आणि भविष्यातील स्मार्ट सिटीवरील सादरीकरण करु शकणार आहेत.
‘नाशिक पॅव्हेलीयन’ ही नवीन संकल्पना प्रदर्शनाचे आकर्षण आहे त्यामध्ये काय पाहायला मिळणार आहे.

भविष्यातील नाशिक कसे असेल या करिता संकल्पना क्रेडाई राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर आणि क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनिल कोतवाल यांची संकल्पनेतून ‘नाशिक पॅव्हेलीयन’ उभारण्यात आले आहे.

ते आकर्षण ठरेल. त्यामध्ये नाशिकची वैशिष्टे, पर्यटन केंद्र, हवामान, उद्योग विकास, नाशिकची जगभर ओळख असलेली शक्तीस्थाने, आकर्षण यांच्यावर प्रभावीपणे माहितीपटातून संदेश देण्यात आला. हा माहितीपट नंतर ग्राहकांना यूट्यूब उपलब्ध करुन देण्यात येईल.

क्रेडाई प्रकल्प अधिकृत, पर्यावरण नियमांचे पालन करून बांधलेले असून स्वच्छ, पारदर्शी व्यवहार, वेळेत घरांचा ताबा यासह मुख्य म्हणजे ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाल्यास क्रेडाई कस्टमर प्रिव्हेन्शन सेल कार्यरत असून येथे जर एखाद्या ग्राहकाने तक्रार नोंदवली तर त्यांची अडचण त्वरित दूर करण्यासाठी क्रेडाई टीम प्रयत्नशील असते.

प्रदर्शनास भेट देणार्‍यांसाठी क्यु आर कोड तसेच संगणीकृत प्रवेश राहणार असून प्रत्येक ग्राहकांची माहिती विकासकांना, व्यवसायिकांना उपलब्ध होणार आहे. यासह विविध डिजीटल माध्यमे सोशल माध्यमातून आम्ही प्रदर्शनाची जाहिरात, प्रसिद्ध केली असून स्थानिक टीव्ही तसेच नभोवाणी माध्यमे, वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आहे.

प्रदर्शनात चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून त्यामध्ये धुराळा चित्रपटातील कलाकारांचा चमू भेट देणार आहे. यासह सुरेल संगीताची मैफल आणि चला हवा येऊ द्या चे कलाकार यावेळी कला सादर करतील.

युनिफाईड डिसीपीआर (एक समान विकास नियंत्रण निमवाली) तत्काळ लागू करावी. प्रधान मंत्री आवास योजेनत सदनिका घेतल्यास 1 टक्का स्टॅम्प ड्यूटी घेतली जाते. मात्र त्याच क्षेत्रफळातील सदनिका या योजनेतून विकसकांकडून सदनिका न बणवल्यास 5 टक्के स्टॅम ड्यूटी 1 टक्का रजिस्ट्रेशन फिस, 1 सेल्स टॅक्स लागतो आमची अशी मागणी आहे की एक हजार रुपये स्टॅम ड्यूटीसाठी आमचा आग्रह आहे. तसेच जास्तबांधकाम साहित्यावरील जीएसटी दर कमी व्हावा, जेणे करुन कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होऊन दरात कपात होणास वाव मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या