Thursday, May 2, 2024
HomeनाशिकIPL 2020 : विराट सेनेचा विजय

IPL 2020 : विराट सेनेचा विजय

SHARJA । वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरला मोठा धक्का दिला. एबी डिव्हिलियर्सचे झंझावाती अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने केकेआरवर विजय मिळवला. आरसीबीने यावेळी केकेआरवर 82 धावांनी सर्वात मोठा विजय साकारला.

- Advertisement -

आरसीबीच्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. यावेळी केकेआरची सलामी करण्यासाठी टॉम बँटन हा पहिल्यांदाच आला होता. हा त्याचा पहिलाच सामना होता.

पण टॉमला यावेळी फक्त 9 धावा करता आल्या. केकेआरचे अनुभवी फलंदाज यावेळी लवकर बाद झाले आणि केकेआरला धक्के बसत गेले. कर्णधार दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गन यांना यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही.

आंद्रे रसेलची फटकेबाजीही यावेळी क्षणभंगुर ठरली. रसेलला या सामन्यात 16 धावा करता आल्या. फॉर्मात असलेला सलामीवीर शुभमन गिलने यावेळी 25 चेंडूंत 34 धावा केल्या, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही.

एबी डिव्हिलियर्सच्या फलंदाजीचे वादळ आज पुन्हा एकदा अनुभवता आले. एबीने फक्त 23 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करत केकेआरच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. एबीने यावेळी फक्त 33 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद 73 धावांची वादळी खेळी साकारली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने यावेळी केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आरसीबीच्या संघाला यावेळी केकेआरपुढे 195 धावांचे आव्हान ठेवता आले. कोहलीने यावेळी 28 चेंडूंत नाबाद 33 धावा केल्या.

कोहलीने यावेळी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहलीचा हा निर्णय योग्य असल्याचे पाहायला मिळाले. कारण आजच्या सामन्यात पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाला चांगली सलामी मिळाली.

आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या आरोन फिंचने आजच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याचबरोबर देवदत्त पडीक्कलनेही त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे आरसीबीला यावेळी 67 धावांची चांगली सलामी मिळाली.

पडीक्कल यावेळी मोठा फटका मारताना बाद झाला, पडीक्कलने 23 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 32 धावा केल्या. फिंचनेही या सामन्यात चांगल्या धावा केल्या. पण फिंचचे शतक यावेळी फक्त तीन धावांनी हुकले. फिंचने 37 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 47 धावा केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या