Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : गुजरातचा राजस्थानवर विजय

IPL-2022 : गुजरातचा राजस्थानवर विजय

कोलकाता | वृत्तसंस्था ( Kolkata )

कोलकाता मधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयपीएल-२०२२ (IPL-2022) चा क्रिकेटचा सामना आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Gujrat Titans Vs Rajsthan Royal ) यांच्यात खेळण्यात आला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

गुजरातच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून सलामीला जोस बट्लर व यशस्वी जयस्वाल फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात यश दयालच्या गोलंदाजीवर वृद्धिमान शाहने यशस्वी जयस्वालला झेल बाद करत राजस्थानच्या संघाला पहिला धक्का दिला. यशस्वी जयस्वालने ८ चेंडूत ३ धावा केल्या. अल्जारी जोसेफने संजू सॅॅमसनला झेल बाद केले.संजू सॅॅमसनने २६ चेंडूत ४७ धावा केल्या. हार्दिक पंड्याने देवदत्त पडीक्क्लला क्लीन बोल्ड केले. देवदत्त पडीक्क्लने २० चेंडूत २८ धावा केल्या. शिमराॅॅन हेटमायर अवघ्या ४ धावांवर राहुल तेवतीया कडून झेलबाद झाला. जोस बट्लरने आजच्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. जोसने ५६ चेंडूत २ षटकार व १२ चौकार लगावत एकूण ८९ धावा करत अल्जारी जोसेफ कडून धावचीत झाला. २० व्या षटका अखेर राजस्थानच्या संघाने ६ गडी बाद १८८ धावा केल्या.

राजस्थानच्या संघाने दिलेल्या १८९ धावांचे आव्हान स्वीकारत गुजरातच्या संघाकडून वृद्धिमान शहा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले. पहिल्या शतकाच्या दुसऱ्या चेंडूवर संजू सॅॅमसनने वृद्धिमान शहाला शून्यावर झेल केले. शुभमन गिलला देवदत्त पडीक्क्लने धावचीत केले.शुभमनने २१ चेंडूत ३५ धावा केल्या. जोस बट्लरने मॅॅथ्यू वेड्सला झेल बाद केले. मॅॅथ्यू वेड्सने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. डेविड मिलर व हार्दिक पंड्याच्या जोडीने आक्रमक फलंदाजी केली. हार्दिक पंद्याने २७ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. तर डेविड मिलरने ३८ चेंडूत ५ षटकार व ३ चौकार लगावत एकूण ६८ धावा करत गुजरातच्या संघास विजय मिळवून दिला. गुजरातने ३ चेंडू शिल्लक ठेवत ७ गडी राखून राजस्थानच्या संघावर विजय मिळवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या