Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याIPL-2022 : राजस्थानचा बंगळुरूवर विजय

IPL-2022 : राजस्थानचा बंगळुरूवर विजय

पुणे | वृत्तसंस्था ( Pune )

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आयपीएल २०२२ (( IPL-2022 ) चा क्रिकेटचा सामना रॉयल चॅॅलेन्जेर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Royal Challengers Bangloare Vs Rajasthan Royals )यांच्यात खेळला गेला. यात बेंगलोरच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

बेंगलोरच्या च्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून सलामीला जॉस बट्लर व देवदत्त पडीक्क्ल फलंदाजी साठी मैदानात आले. मोहमद सिराजच्या गोलंदाजीवर देवदत्त पायचीत झाला.देवदत्त ने ७ चेंडूत ७ धावा केल्या.देवदत्त नंतर रविचन्द्रन अश्विन फलंदाजीसाठी मैदानात आला. जॉस बट्लरला मोहमद सिराज ने जॉश हेझलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद करत माघारी पाठविले. जॉस बट्लरने ९ चेंडूत ८ धावा केल्या.

मोहमद सिराजच्या गोलंदाजीवर रविचन्द्रन अश्विन झेलबाद झाला रविचन्द्रनने ९ चेंडूत १७ धावा केल्या. ८ व्या षटकात राजस्थानच्या संघाच्या ३ गडी बाद ६३ धावा अशी धावसंख्या झाली. संजू सॅॅमसनला हसरंगाने क्लीन बोल्ड केले. संजू सॅॅमसनने २१ चेंडूत ३ षटकारां समवेत १ चौकार लगावत २७ धावा केल्या. डॅॅरिल मिचेल २४ चेंडूत १६ धावा करून झेल बाद झाला. सुयश प्रभूदेसाईने शिमराॅॅन हेटमायरला झेलबाद केले. शिमराॅॅनने ७ चेंडूत ३ धावा केल्या.ट्रेंंट बोल्टही ५ धावा संख्येवर तंबूत परतला. रियान पराग ने ३१ चेंडूत नाबाद ५१ धावा करत अर्धशतक पूर्ण केले. २० षटकात राजस्थानच्या संघाने ८ गडी बाद १४४ धावा केल्या.

राजस्थानच्या संघाने दिलेल्या १४५ धावांचा पाठलाग करताना बेंगलोरच्या संघाकडून सलामीला विराट कोहली व फाफ डूप्लेसी फलंदाजीस आले. रियान पराग ने विराट कोहलीला धाव बाद करत अवघ्या ९ धावांवर तंबूत पाठविले. रजत पाटीदारला १६ धावांवर रविचन्द्रन ने क्लीन बोल्ड केले.कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर जॉस बट्लरने फाफ डूप्लेसीला झेलबाद केले. डूप्लेसीने २१ चेंडूत २३ धावा केल्या . देवदत्त पडीक्क्लने ग्लेन मॅॅक्स्वेलला झेल बाद करत शून्यावर तंबूत पाठविले. सुयश प्रभूदेसाई अवघ्या २ धावांवर झेलबाद झाला. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर वानिंदू हसरंंगा १३ चेंडूत १८ धावा करत बाद झाला. बेंगलोर च्या संघाच्या खेळाडूंची एका मागून एक बाद होण्याची शृंखला चालूच राहिली. बेंगलोरच्या संघाने सर्व गडी बाद ११५ धावा केल्या .

- Advertisment -

ताज्या बातम्या