Friday, May 17, 2024
Homeक्रीडाआयपीएल २०२३ चा लिलाव 'या' तारखेला होण्याची शक्यता

आयपीएल २०२३ चा लिलाव ‘या’ तारखेला होण्याची शक्यता

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२३ (IPL 2023) ही स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून स्पर्धेच्या १६ व्या हंगामाचा लिलाव (Auction) कधी होणार? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे…

- Advertisement -

आयपीएल २०२३ चा लिलाव १६ डिसेंबर रोजी बंगळूरमध्ये ( Bangalore) होण्याची शक्यता आहे. हा एक मिनी लिलाव राहणार असून मागील वर्षीच्या मेगा लिलावाच्या तुलनेत छोटा असणार आहे. तसेच यंदाही अनेक संघातील खेळाडूंमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

तर आयपीएल २०२२ मध्ये झालेल्या मेगा लिलावादरम्यान स्पर्धेत सहभागी झालेल्या संघासाठी ( Team) ९० कोटी इतकी रक्कम निर्धारीत ठेवण्यात आली होती. पंरतु यावर्षी ही रक्कम ९५ कोटी असण्याची शक्यता आहे. संघातील खेळाडूंच्या ट्रेडिंग विंडोनंतर ही रक्कम कमी जास्त असू शकते.

दरम्यान, यंदाच्या लिलावात काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचा थरार हा होम अवे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर करोनामुळे (Corona)मागील २ वर्ष आयपीएल सामन्यांचे आयोजन नेहमीसारखे होतं नव्हते. त्यामुळे २०२३ मध्ये आयपीएल जुन्या ढंगात पुन्हा पाहता येणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या