Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : GT vs CSK : गुजरातचा चेन्नईवर विजय

IPL-2023 : GT vs CSK : गुजरातचा चेन्नईवर विजय

अहमदाबाद । वृत्तसंस्था

आजपासून जगातील सर्वात मोठी श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएल स्पर्धेचा सोळावा हंगाम सुरु झाला. या हंगामात १० संघ सहभागी झाले असून, २८ मे पर्यंत खेळवल्या जाणाऱ्या संपूर्ण हंगामात ७४ सामने होणार आहेत. ही स्पर्धा ५८ दिवस चालणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये होम आणि अवे फॉरमॅट खेळवण्यात येणार आहे सर्व १० संघांना ७ सामने होम आणि ७ सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळावे लागणार आहेत.

- Advertisement -

आज पहिल्या दिवशी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना खेळविण्यात आला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारली.

गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाड व डेव्हन कॉनव्हे सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या सुरवातीच्या दुसऱ्या षटकातच मोहमद शमीने डेव्हन कॉनव्हेला क्लीन बोल्ड केले. ऋतुराज गायकवाड व मोईन अली यांच्या जोडीने शानदार फलंदाजी करत असताना वृद्धिमान सहाने मोईन अलीला २३ धावांवर झेल बाद केले. बेन स्टोक्सला वृधीमान शहाने झेल बाद करत अवघ्या ७ धावांवर माघारी पाठविले. १२ व्या षटकाअखेर ११२ धावा ३ गडी बाद अशी चेन्नईच्या संघाची स्थिती होती.तेराव्या षटकात जोशुआ लिटलने अंबाती रायडूला १२ धावांवर क्लीन बोल्ड केले.

आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाडने धुवाधार फलंदाजी केली. ऋतुराजने ५० चेंडूत ९ षटकार व ४ चौकार लगावत ९१ धावा केल्या. सामन्याच्या अठराव्या षटकात अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने ऋतुराजला झेल बाद केले. महेंद्रसिंह धोनी १४ धावांवर नाबाद राहिला. विसाव्या षटका अंती चेन्नईच्या संघाने ७ गडी बाद १७८ धावा केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

चेन्नईच्या संघाने दिलेल्या १७९ धावांचे आव्हान स्वीकारत गुजरातच्या संघाकडून वृद्धिमान शहा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले. गुजरातच्या संघाच्या फलंदाजीची सुरवात फारशी चांगली झाली नाही. चौथ्या षटकात शिवम दुबेने वृद्धिमान शहाला झेल बाद केले.वृद्धिमानने १६ चेंडूत २५ धावा केल्या.आठ षटकात १ गडी बाद ८२ धावा अशी स्थिती गुजरातच्या संघाची होती. १०व्या षटकात महेंद्रसिंघ धोनीने साई सुदर्शनला २२ धावांवर झेल बाद केले. १३व्या षटकात रवींद्र जडेजाने हार्दिक पंड्याला ८ धावांवर क्लीन बोल्ड केले.

शुभमन गिलने ३६ चेंडूत ३ षटकार व ६ चौकार लगावत ६३ धावा केल्या. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने शुभमनला झेल बाद केले. विजय शंकरने २१ चेंडूत २७ धावा केल्या.मिशेल एसने विजय शंकरला झेल बाद केले. राहुल तेवतिया व रशीद खानच्या जोडीने गुजरातच्या संघाला विजय मिळवून दिला. राहुल तेवतीयाने विजयी चौकार मारत गुजरातच्या संघाने चेन्नईवर ४ चेंडू शिल्लक व ५ गडी राखून विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या