Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : LSG vs DC : लखनौ सुपर जायंट्सचा दिल्ली...

IPL-2023 : LSG vs DC : लखनौ सुपर जायंट्सचा दिल्ली कॅॅपिटल्सवर विजय

लखनौ | वृत्तसंस्था

लखनौ येथील इकाना इंटरनॅॅशनल स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅॅपिटल्स यांच्यात IPL-2023 चा क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. यात लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

दिल्ली कॅॅपिटल्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौच्या संघाकडून कर्णधार लोकेश राहुल व काईल मेयर्स सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या चौथ्या षटकात चेतन साकारीयाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने कर्णधार लोकेश राहुलला झेल बाद केले. लोकेश राहुलने १२ चेंडूत ८ धावा केल्या. अकराव्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कर्णधार डेविड वार्नेरने दीपक हुड्डाला झेल बाद केले. दीपक हुड्डाने १८ चेंडूत १७ धावा केल्या.

काईल मेयर्सने आक्रमक फलंदाजी केली. मेयर्सने ३८ चेंडूत ७ षटकार व २ चौकार लगावत ७३ धावा केल्या. सामन्याच्या १२व्या षटकात अक्षर पटेलने काईल मेयर्सनेला क्लीन बोल्ड केले. १२ व्या षटका अखेरीस लखनौच्या संघाची ३ गडी बाद १०१ धावा अशी स्थिती होती. १५व्या षटकात मार्कस स्टोनीसला सर्फराज खानने १२ धावांवर झेल बाद केले तर निकोलस पुरणने २१ चेंडूत ३६ धावा करत पृथ्वी शाॅॅ कडून झेल बाद झाला. चेतन साकारीयाच्या गोलंदाजीवर सर्फराज खानने आयुष बडोनीला झेल बाद केले. आयुषने ७ चेंडूत १८ धावा केल्या. विसाव्या षटकाअंती लखनौच्या संघाने ६ गडी बाद १९३ धावा केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने दिलेल्या १९४ धावांचे आव्हान स्वीकारत दिल्ली कॅॅपिटल्सच्या संघाकडून कर्णधार डेविड वॉर्नर व पृथ्वी शाॅॅ प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या पाचव्या षटकात मार्क वूडने पृथ्वी शाॅॅला क्लीन बोल्ड करत दिल्लीच्या संघाला पहिला धक्का दिला.पृथ्वी शाॅॅने ९ चेंडूत १२ धावा केल्या.

पाठोपाठ मिचेल मार्शला शून्यावर क्लीन बोल्ड करत मार्क वूडने दिल्लीच्या संघास दुसरा धक्का दिला. कृष्णाप्पा गौतमने सर्फराज खानला झेल बाद करत ४ धावांवर माघारी पाठविले. ८व्या षटकाअंती ३ गडी बाद ५३ धावा अशी स्थिती दिल्ली कॅॅपिटल्सच्या संघाची होती.

रवी बिष्णोईच्या गोलंदाजीवर काईल मेयर्सने रॉयली रासुला झेल बाद केले. रॉयली रासुने २० चेंडूत ३० धावा केल्या. आर पॉवेल अवघ्या एक धावावर तंबूत परतला. १५व्या षटका अखेरीस ५ गडी बाद ११० धावा अशी स्थिती दिल्लीच्या संघाची होती.

आवेशखानच्या गोलंदाजीवर कृष्णाप्पा गौतमने दिल्ली कॅॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नरला झेल बाद केले. वॉर्नरने ४८ चेंडूत ५६ धावा केल्या. अक्षर पटेल ने ११ चेंडूत १६ धावा केल्या तर कुलदीप यादव ने नाबाद ६ धावा केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

वीसाव्या षटकाअंती दिल्ली कॅॅपिटल्सच्या संघाने ९ गडी बाद १४३ धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने दिल्ली कॅॅपिटल्सच्या संघावर ५० धावांनी विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या