Sunday, April 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : आज रंगणार सुपर संडेचा थरार; गुजरात-चेन्नई, कोलकाता-लखनौ आमनेसामने

IPL 2026 : आज रंगणार सुपर संडेचा थरार; गुजरात-चेन्नई, कोलकाता-लखनौ आमनेसामने

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट (IPL) स्पर्धेमध्ये रविवारी (दि. २६) दुपारी ३:३० वाजता येथील एम.ए. चिदंबरम मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये (GT vs CSK) सामना खेळवण्यात येणार आहे. गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपदशुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. तर ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद असणार आहे. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय संपादन करून सहा गुणांची कमाई करत सरस नेट रनरेटमुळे गुणतालिकेत पाचवे स्थान निश्चित केले आहे. आता गुजरात टायटन्स संघाला पराभूत करून विजयी चौकार मारण्याची संधी चेन्नई सुपर किंग्जकडे असणार आहे.

- Advertisement -

दुसरीकडे गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय संपादन केला आहे. (KKR VS LSG) तर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध अखेरच्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज असणार आहे.आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये उभय संघांमध्ये आठ सामने खेळले गेले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघ ४-४ सामन्यात विजयी झाले आहेत. तसेच चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम मैदानावर दोन सामने खेळले गेले असून, गुजरात टायटन्स संघाला अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

प्रमुख खेळाडू : शुभमन गिल, साई सुदर्शन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे.

कोलकाता-लखनौ सायंकाळी भिडणार

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला असून, अंतिम ४ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या सामन्यात ४ गडी राखून विजय संपादन करून बाद फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम राखले आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स सज्ज असणार आहे. रविवारी (दि. २६) लखनौ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना मैदानावर दोन्ही संघ समोरासमोर असतील. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद असणार आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाला पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सलग ३ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची लढत असणार आहे. विशेष म्हणजे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ७ सामने खेळले गेले असून, लखनौ सुपर जायंट्सने ५-२ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र लखनौ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना मैदानावर एकमेव सामना झाला आहे, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ८ गडी राखून विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी लखनौ सुपर जायंट्सकडे असणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : बनावटगिरीचा बंगळुरू प्लॅन; उद्योजकाच्या सह्यांची छेडछाड, २०...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमधील एका नामांकित उद्योजकाला चक्क बंगळुरू न्यायालयाचे (Bangalore Court) समन्स धाडून २० लाख रुपयांच्या वसुलीचा बनावट दावा दाखल केल्याचा खळबळजनक...