Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशIran-Israel Conflict: इराण-ईस्रायल संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री; इराणमधील ३ अणुऊर्जा केंद्रांवर अमेरिकेचा...

Iran-Israel Conflict: इराण-ईस्रायल संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री; इराणमधील ३ अणुऊर्जा केंद्रांवर अमेरिकेचा बॉम्ब हल्ला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि ईस्रायलमध्ये संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष थांबण्याची कोणतेही चिन्ह दिसत नसून आता इराण ईस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने एन्ट्री घेतली आहे. अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री उशिरा इराणवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर याबाबतची घोषणा केली. अमेरिकेने इराणमध्ये घुसून हल्ले केला. इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर अमेरिकेच्या लष्कराने बॉम्ब वर्षाव केला. अमेरिकेच्या इराणविरोधातील मोहिमेची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली.

अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील इराणच्या अणुस्थळांवर अतिशय यशस्वी हवाई हल्ला केला आहे. पर्वतांमध्ये खोलवर असलेले इराणचे फोर्डो अणुस्थळ आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. हवाई दलाने इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बेचा वर्षाव केला.

- Advertisement -

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, ‘आम्ही फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान इराणमधील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ला केला. आमची सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत. पहिले टार्गेट असलेल्या फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला. सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही, जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे.’

YouTube video player

बी-२ बॉम्बर्सने बॉम्बचा वर्षाव
अमेरिकन हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेने त्यांचे स्टिल्थ बी-२ बॉम्बर्स इराणकडे पाठवले होते. या निर्णयानंतर अमेरिका या युद्धात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणचे ३ अणूऊर्जा केंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. बी-२ बॉम्बर्स हे एकमेव विमान आहे जे बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यास सक्षम आहे. अमेरिकेने या बी-२ बॉम्बर्सने फोर्डो नष्ट केले आहे.

इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले होते. दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या या विधानाच्या आदल्या दिवशी अमेरिकेने त्यांचे अत्याधुनिक लढाऊ विमान बी-२ बॉम्बर्स प्रशांत महासागरात असलेल्या त्यांच्या ग्वाम हवाई तळाकडे पाठवले होते.

डोनाल्ड ट्रम्प भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता भाषण करतील. यात ट्रम्प हल्ल्याबाबतचा अधिकचा तपशील देण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची कबूली दिली आहे की हा हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे २:३० वाजता झाला. फोर्डो अणुस्थळ जमिनीखाली आहे. मात्र तरीही हे अणुस्थळ नष्ट करण्यात अमेरिकेला यश आले असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. अमेरिकेने तीन अणुऊर्जा केंद्रांवर बी-२ बॉम्बर्सने बॉम्ब टाकले आहेत. अमेरिकेने त्यांच्या पश्चिम आशियातील सर्वच लष्करी तळांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...