Friday, September 11, 2026
Homeदेश विदेशIran-Israel Conflict: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान मोठी बातमी! सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेईंची निवड

Iran-Israel Conflict: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान मोठी बातमी! सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेईंची निवड

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज (4 मार्च) पाचवा दिवस आहे. इराणने अमेरिकेच्या मुस्लीम दोस्त राष्ट्रांना मिसाईल आणि ड्रोन मारा सुरुच ठेवला आहे. आज दुबईत अमेरिकन दुतावासावर इराणने हल्ला केला. इस्रायलने लेबनॉनमध्ये इराण समर्थक गट हिजबुल्लाहविरुद्ध लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. दर काही वेळाने मोठ्या बातम्या समोर येत आहेत. शनिवारी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केल्यानंतर इराणकडून लगेचच सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांचे नाव घोषित करण्यात आले. मात्र, सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर अगदी काही तासातच त्यांना हल्ल्यात ठार मारण्यात आले. आता इराणकडून या युद्धाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली असून आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेईची निवड इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून करण्यात आली.

युद्ध सुरू होऊन २४ तास होत नाहीत तोवरच अमेरिका आणि इस्रायलने सर्वात अगोदर अयातुल्ला अली खामेनेई यांना हल्ल्यात ठार केले. त्यानंतर आता अली रजा अराफी यांना आता पुन्हा खामेनेई यांच्याकडे इराणची जबाबदारी आहे. इराणकडून नुकताच मोजतबा खामेनेईच्या नावाची घोषणा करण्यात आली. इराण सध्याच्या त्याच्या इतिहासातील सर्वात वाईट काळातून जात आहे.

- Advertisement -

मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम; रुपया डॉलरपुढे ९२वर कोसळला, भारतीय रुपयाची ऐतिहासिक पडझड

इराण इंटरनॅशनलच्या एका विशेष अहवालानुसार, ही निवड शक्तिशाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या दबावाखाली करण्यात आली होती. सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे, तज्ञ सभेची पूर्ण बैठक शक्य नव्हती, म्हणून व्हर्च्युअल बैठका आणि अंतर्गत सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इराणी क्रांतीनंतर तज्ज्ञांच्या सभेने सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची ही दुसरी वेळ आहे. मोजतबाचे वडील अली खामेनेई यांची ४७ वर्षांपूर्वी १९८९ मध्ये सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली होती.

असेंबली ऑफ एक्सपर्टने अली खमेनेई यांचे पुत्र मोजतबा यांची पुढील सर्वोच्च नेते म्हणून निवड केली आहे. ५६ वर्षीय मोजतबा देशाच्या सर्वोच्च नेत्याची जबाबदारी स्वीकारतील, जे इराणमधील सर्वोच्च पद आहे. मोजतबा यांना बऱ्याच काळापासून अली खमेनेई यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.

India Oil Stocks : भारतात इंधन आणीबाणी? केवळ २५ दिवसांचा तेलसाठा, आयात मार्ग बंद

न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, असेंबली ऑफ एक्सपर्ट ही ८८ सदस्यांची धर्मगुरूंची संस्था आहे. इराणच्या संविधानानुसार, सर्वोच्च नेत्याची नियुक्ती, देखरेख आणि आवश्यक असल्यास त्यांना काढून टाकण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, मंगळवारी त्यांनी दोन व्हर्चुअल मिटींग घेतल्या, एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी.

मोजतबा अली खामेनेई कोण आहे?
मोजतबा खामेनेई (वय 56) हे अली खामेनींचे दुसरे सुपूत्र आहेत. त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले असून हुज्जतुल-इस्लाम ही उपाधी मिळवली आहे. ते खामेनेईंच्या कार्यालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि अनेक वर्षांपासून पडद्यामागून इराणचे राजकारण नियंत्रित करत आहेत.

मोजतबा खामेनेईंनी सरकारचे महत्त्वाचे कुटनीतिक निर्णय घेतले आहेत आणि इराण-इराक युद्धात सैन्यातही सेवा बजावली आहे. ते इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्ससोबत जवळचे संबंध ठेवतात. खामेनींना त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे मोजतबा आता देशाची सत्ता तात्पुरती हाती घेत आहेत.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...