Saturday, May 30, 2026
Homeदेश विदेशइराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी! मायक्रोसॉफ्ट, ॲपल पासून ते 'या' कंपन्यांवर हल्ला करण्याची...

इराणची अमेरिकेला हादरवणारी धमकी! मायक्रोसॉफ्ट, ॲपल पासून ते ‘या’ कंपन्यांवर हल्ला करण्याची धमकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्ध सुरु होऊन एक महिना झाला असून अजूनही युद्ध थांबायचे नाव घेत नाही. उलट अमेरिकेकडून इराणविरोधात अधिक तीव्र हल्ले करण्यात येत असून इराणला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे इराणकडून ही अमेरिका इस्रायलला टार्गेट करण्यात येत आहे. अमेरिकेने नुकताच इराणवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला. यानंतर इराणने अमेरिकेला हादरवणारी धमकी दिली आहे.

- Advertisement -

इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने १ एप्रिलपासून अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान आणि औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; अक्षय कर्डिलेंच्या नावावर शिक्कामोर्तब

या कंपन्यांचा समावेश
इराणने एकूण १८ कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला, बोईंग, सीस्को, एच पी, ओरॅकल, मेटा, डेल, पॅलेंटीर, व्हिडीया,जे पी मॉरगन, जनरल इलेक्ट्रिक, स्पायर सोल्युशन, जी ४२. या कंपन्यांचा समावेश आहे.

सदर १८ अमेरिकन कंपन्या इस्रायली आणि अमेरिकन लष्करी तसेच गुप्तचर संस्थांशी सहकार्य करत असल्याचा दावा इराणने केला आहे. इराणने या कंपन्यांना आपल्या देशाविरुद्ध झालेल्या सायबर हल्ल्यांसाठी जबाबदार धरले आहे आणि स्वतःच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे. इराणच्या निवेदनानुसार, इराणमध्ये होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी कृत्याचा बदला म्हणून या कंपन्यांच्या प्रादेशिक विभागांना उद्ध्वस्त केले जाईल. तेहरानच्या वेळेनुसार बुधवारी, १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून हे लक्ष्य निर्धारित केले जातील.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...