Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहने जप्त करा

AMC : रस्त्यावर बेशिस्तपणे लावलेली वाहने जप्त करा

मनपा प्रशासनाचे पे अँड पार्कच्या ठेकेदाराला आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. शहरातील वाहतुकीला व पार्किंगला शिस्त लागावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन करून तेथे फलकही लावले आहेत. अशा नो पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने व बेशिस्तपणे लावलेली वाहने टोविंग व्हॅनमार्फत कारवाई करून जप्त करावी, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत.

- Advertisement -

शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्कच्या अंमलबजावणीसाठी रस्त्याच्या दुतर्फा जागा निश्चित करून दिलेल्या आहेत. तसेच, नो पार्किंग झोनही निश्चित केलेले आहेत. या नो पार्किंग झोनमध्ये नागरिक वाहने लावत आहेत. बेशिस्त पार्किंगमुळे व नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. बेशिस्तपणे व नो पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने जप्त करून सदर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश डांगे यांनी दिले आहेत.

YouTube video player

दरम्यान, बायपास रस्त्यावरून महामार्गाकडे येणारी व जाणारी वाहने शहरातून प्रवेश करत आहेत. ही रहदारी वाढल्याने शहरातील महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. त्यामुळे शहरातून होणारी अवजड वाहतूक बायपास रस्तामार्गे वळवावी, यासाठी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसेच, बायपास रस्त्यावर चारचाकी वाहनांना टोल माफ केल्यास शहरातील रहदारीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचेही डांगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...