मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) बिगुल वाजले असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी (Vote Counting) होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली असून अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. अशातच आता आयआरएस अधिकारी (IRS Officer) समीर वानखेडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची समोर आली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! चांदवडमधून राहुल आहेरांची भावासाठी माघार; पक्षाकडे उमेदवारी देण्याची केली मागणी
सध्या चेन्नईमध्ये पोस्टिंग असलेले समीर वानखेडे (Sammeer Wankhede) राजीनामा देऊन निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. काही दिवसातच महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Shivsena) समीर वानखेडे प्रवेश करणार आहेत. वानखेडे मुंबईच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यासंदर्भात त्यांची शिंदेंच्या शिवसेनेची अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा : Nirmala Gavit : इगतपुरी मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलणार; निर्मला गावित काँग्रेसमध्ये परतणार?
धारावीमध्ये वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) आमदार (MLA) होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या जागी त्यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. ज्योती गायकवाड यांनी उमेदवारी मिळाल्यास यंदाच्या निवडणुकीमध्ये धारावीत ज्योती गायकवाड आणि समीर वानखेडे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : : Nashik Civil Hospital News : बाळ अदलाबदल प्रकरणी सात डॉक्टरांसह एका परिचारिकेचे निलंबन
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी समीर वानखेडे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political) चर्चेचा विषय बनले होते. कारण समीर वानखेडे यांनी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात (Drug Case) अटक केली होती. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार होते. त्यावेळी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप सुद्धा झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा