Friday, May 3, 2024
Homeक्रीडाभारतीय संघात धोनीची जागा इशान किशन घेऊ शकतो

भारतीय संघात धोनीची जागा इशान किशन घेऊ शकतो

मुंबई l Mumbai

यंदाच्या IPL च्या तेराव्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाने पटकावले. मुंबईने अंतिम फेरीत दिल्लीवर ५ गडी राखून मात केली. कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक आणि इशान किशनने मधल्या फळीत केलेली फटकेबाजी हे संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. यंदा मुंबईकडून खेळत असताना इशान किशनने चांगलेच प्रभावित केले. किशन हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाला असून तो भारतीय एकदिवसीय आणि टी-२० संघात धोनीची जागा घेऊ शकतो, असे मत बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना एम.एस.के. प्रसाद म्हणाले, “इशान किशनसारख्या छोट्या चणीच्या खेळाडूला फटकेबाजी करताना पाहणं खरंच आश्वासक आहे. यंदाचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी चांगला गेलाय. सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर आणि जिथे गरज असेल तिकडे सलामीला येऊनही त्याने आपल्यातले गुण सिद्ध केले आहेत. संघाला गरज असेल त्याप्रमाणे आपल्या फलंदाजीत बदल करुन खेळ करण्याच्या त्याचं कौशल्य वाखणण्याजोगं आहे. त्यामुळे भारतीय संघात टी-२० आणि वन-डे संघात त्याला धोनीच्या जागेवर स्थान मिळू शकतं.”

दरम्यान, २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर धोनी वर्षभर क्रिकेट खेळलेला नाही. धोनीच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची संधी दिली, परंतू वर्षभरात पंतने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाने आता लोकेश राहुल आणि संजू सॅमसनचा पर्याय वापरायचं ठरवलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या