Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशISIS दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त; ८ जणांच्या मुसक्या आवळल्या, देशभरात तपास सुरू

ISIS दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त; ८ जणांच्या मुसक्या आवळल्या, देशभरात तपास सुरू

दिल्ली । Delhi

दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि झारखंड एटीएसने संयुक्तपणे केलेल्या एका मोठ्या कारवाईत, ISIS दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

या कारवाईमुळे झारखंड आणि आसपासच्या परिसरातील दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. यामध्ये मुंबईहून रांचीला आलेल्या आफताब नावाच्या व्यक्तीसह त्याचा म्होरक्या अशहर दानिश यालाही अटक करण्यात आली आहे.

YouTube video player

स्पेशल सेल आणि एटीएसने एकत्र येत रांचीतील लोअर बाजारमधील तबारक लॉजमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक केमिकल, बंदुका आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, दिल्लीमध्येही एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी आतापर्यंत देशभरात १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. तबारक लॉजमध्ये लपलेल्या काही संशयितांना शस्त्रे आणि स्फोटक साहित्यासह अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

दिल्ली पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे दिल्लीतून आफताब नावाच्या दहशतवाद्याला अटक केली. चौकशीदरम्यान, आफताबने दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याचा कट रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य, व्हिडिओ आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी झारखंडमध्ये छापा टाकला आणि या दहशतवादी नेटवर्कचा म्होरक्या असलेल्या अझहर उर्फ दानिश याला रांचीमधील इस्लामनगर येथून ताब्यात घेतले. दानिश याचे थेट ISIS सोबत कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...