Sunday, November 3, 2024
Homeशब्दगंधनद्या व संगम

नद्या व संगम

-अंजली राजाध्यक्ष

लाहोल स्पितीच्या दर्‍यांना सुशोभीत करणारी व त्याच दर्‍यांत वाहणारी स्पिती हिमनदी आम्हाला खूप खूप उंचीवर दिसली. चित्कूलनंतर आमचा दौरा नाकोपर्यंत होता. त्याआधी ती आम्हाला दिसू लागली. किन्नौर जिल्ह्यात खाबोजवळ सतलजशी तिचा संगम होतो. आमचा प्रवास खालून वर चालला होता. स्पिती व्हॅलीपर्यंत तिचा सहवास आम्हाला लाभला.

- Advertisement -

कुंझूम या हिमालय पर्वतराजीत उगम लावणारी ही हिमनदी लाहोल व स्पिती या हिमाचल प्रदेशातील जिल्ह्यांना वेगळे करते. आमच्या प्रवासाचा मार्ग रपींळ लश्रेलज्ञ ुळीश असा होता.. शिमला, नारकंदा, रामपूर बुशाहर, जेओरी, सरहान, काझा, कॉमिक, किब्बर व लोसर तेथून कुंझूम खिंडीमार्फत मनालीला उतरून तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहणे असा होता. परंतु कुंझूमला पास पूर्ण बर्फाच्छादित असल्याने किब्बरवरून आम्हाला पुढे जाता आले नाही. त्यामुळे सिमलामार्गे आल्या रस्त्याने आम्हाला चंदिगडला उतरावे लागले. काझाच्या दिशेने जाताना स्पिती व पार्छुम नदीचा संगम पाहिला. खूप गंमत असते संगमाजवळ! कारण प्रत्येक नदी तिच्याबरोबर गाळ, माती आणते व संगमाजवळ हे ठळक वैविध्य जाणवते. स्पिती उंच कड्यांवरून वाहत असली तरी सर्व कडे म्हणजे उंचावरील एक सपाट पठार असल्याने स्पितीचे पात्र बरेच पसरलेले वाटले. पात्रात फार पाणी दिसले नाही. या नदीचा प्रवास लांब व वळणा-वळणाचा दिसला. स्पिती ही या भागातील मुख्य हिमनदी व तिला प्रवाहाच्या दोन्ही बाजूला अनेक उपनद्या (हिमनद्या) येऊन मिळतात. (क्रमशः)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या