Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections : 'इम्पोर्टेड माल' प्रकरणाचा वाद शांत होईना; राऊतांच्या वक्तव्यावर...

Maharashtra Assembly Elections : ‘इम्पोर्टेड माल’ प्रकरणाचा वाद शांत होईना; राऊतांच्या वक्तव्यावर शायना एन. सीं चा संताप

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शायना एन. सी. यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अरविंद सावंत यांनी माफी मागितली असली तरी या प्रकरणी वाद मात्र शांत होताना दिसत नाहीये. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अरविंद सावंत यांनी बाजू घेत महिलांचा काहीही अपमान झाला नसल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी आता शायना एन. सी. यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

काय म्हणाल्या शायना एन.सी?
काल अरविंद सावंत जे माझ्याबद्दल बोलले. स्वाभिमानी महिलेला ते माल म्हणतात. अमीन पटेल हसत होते. आज आरविंद सावंत माफी मागतात. तसे संजय राऊत म्हणतात की महिलांचा कोणताही अपमान झालेला नाही. एक खासदार २०१४ मध्ये तेव्हा मी त्यांच्यासाठी लाडकी बहीण होते. आता मी इम्पोर्टेड माल आहे. इम्पोर्टेड उमेदवार? असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता, माझा पूर्ण परिवार दक्षिण मुंबईत राहतो. पण काही जण वांद्रेमध्ये राहतात आणि वरळीतून निवडणूक लढवतात असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली. संजय राऊत यांनी सांगावे इथे तुम्ही मला हे सर्टिफिकेट दिले की मी इम्पोर्टेड माल आहे. यांच्या प्रचारात मी लाडकी बहीण होते. तर आता मी इम्पोर्टेड माल झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मनस्थितीवर प्रश्चचिन्ह उपस्थित होते. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी माफी मागावी. मुंबा देवीचा आशीर्वाद आहे. मी नेहमी काम करणार. मी एक महिला आहे कोणाची माल नाही. मी मुंबा देवीची मुलगी आहे, लढेल आणि जिंकेल, असे शायना एन. सी. यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या