Friday, May 3, 2024
Homeनगरजलजीवनमध्ये जिल्ह्यात 825 नळ पाणी योजनांना मंजुरी

जलजीवनमध्ये जिल्ह्यात 825 नळ पाणी योजनांना मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जिल्ह्यात राबवण्यात येणार्‍या जलजीवन मिशन योजनेत 825 नळ पाणी योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनांसाठी 1 हजार 300 कोटींचा निधी मिळणार आहे. योजनेतील कामे जलद आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली योजनेची आढावा बैठक झाली.

- Advertisement -

जलजीवन मिशन 2024 अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी येरेकर, मिशनचे प्रकल्प संचालक सुरेश शिंदे, कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे, उपविभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीआरसी, सीआरसी व सीएससी अभियंता व कंत्राटादार व ग्रामिण पाणी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर, जलजीवन मिशन हे 2024 पर्यंत करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता गडधे, जिल्ह्यातील ग्रामिण भागातील कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वाचा सहभाग महत्वाचा आहे. जलजीवन मिशन अभियान राबविण्यामध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. मिशनमधील योजनेच्या कामांची गुणवत्ता महत्त्वाचे आहे.यावेळी उपस्थितांना मागदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसनकरण्यात आले.

यावेळी एस.डी. जिओटेस्टींग लॅब, नगरचे प्रतिनिधी श्रीकांत मंडलिक यांनी जलजीवन मिशन अंतर्गत होणार्‍या नळ पाणी पुरवठा योजनांचे क्षेत्रियस्तरावर कामकाजाची जबाबदारी व अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले. अजिंक्य काटकर, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी भुजल विकास यंत्राणा यांनी नळ पाणी पुरवठा योजनांचे स्त्रोत विकसन व्यवस्थापन व बळकटीकरण याबाबत मार्गदर्शन केले. सिदार्थ पटनाईक टाटा कन्सलंटन्सी, पुणे यांनी नळ पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्रयस्त यंत्रणेची कार्यपध्दती याबाबत मागदर्शन केले.

प्रशांत साळुंके, जजेएम पीडीएमसी यांनी जलजीवन मिशन अंमलबजावणीमध्ये सहाय्यक संस्थांची भूमिका याबाबत मागदर्शन केले. यावेळी जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्यात चांगले कामकाज करणार्‍या कंत्राटदाराचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संनियत्रण व मुल्यमापन तज्ज्ञ रविंद्र ठाणगे यांनी केले. कार्यशाळेचे प्रस्ताविक व उददेश सुरेश कराळे उपअभियंता उपविभाग पंचायत समिती श्रीगोंदा यांनी केले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या