Friday, May 3, 2024
Homeजळगावओव्हरटेक करणार्‍या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ओव्हरटेक करणार्‍या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

समोरुन भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत येणार्‍या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विनोद वेडू चौधरी (वय 42) रा. कुंभारखेडा ता. रावेर हे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गोदावरी अभियांत्रिकीय महाविद्यालयासमोर सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथील रहिवासी विनोद चौधरी हे जळगाव शहरातील जूने जळगावातील पांझरापोळ परिसरात राहणार्‍या आपल्या मावसभावाकडे आले होते.

त्यांची भेट घेवून ते सायंकाळच्या सुमारास ते आपली कामे आटोपून त्यांच्याकडील एमएच 19 डीएन 1462 क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे परतत होते.

राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतांना महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर भुसावळकडून जळगावकडे ओव्हटेक करीत भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने समोरुन दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार विनोद चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

डंपरसह चालक फरार

घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना केला. धडक देणारा चालक डंपरसह घटनास्थळहून पसार झाला.

मयताच्या खिशातील आधारकार्डवरुन मयताची ओळख पटली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरु होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या