Sunday, May 19, 2024
Homeजळगावभादली बु. येथे ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन

भादली बु. येथे ग्रामस्थांचे रास्तारोको आंदोलन

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

भादली बु. येथे यावल-इंदोररोड सिमेंट काँक्रीटीकरण भादली पर्यंत झाला असून त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी ग्रामस्थांना आल्या आहेत.

- Advertisement -

त्यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी करुन या रस्त्यावर शनिवारी रास्तारोको आंदोलन केले. माजी सभापती विजय नारखेडे यांनी ठेकेदराशी संपर्क साधून मध्यस्थी करीत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

जळगाव तालुक्यातील भादली बु. येथे आज दि. 31 रोजी जळगाव-असोदा रेल्वेस्टेशन ते यावल ते इंदोरपर्यंत रोड होत आहे.

तरी भादली बु येथे भादली स्टॅन्डपासून ते भादली गावाची हद्दसंपेपर्यंत गावातील ग्रामस्थांची घरे आहेत. तरी भादली गावामध्ये गावाला लागून सुमारे 40 ते 50 घरे या रोडामुळे त्याचा डायरेक्ट भादली तील रोडाशी संपर्क तुटत आहे व सिमेंट रोडची थिकनेस मोठी असल्यामुळे ग्रामस्थांनी तक्रार केल्या की, आमच्या घराचा संपर्क रोडपासून तुटत आहे व बरेचशे गुरे-ढोरे, गायी, म्हशी या रोडामुळे त्यांचे त्यात पाय अडकून ते पडून जातात व तेथे ग्रामस्थांना काहीही हालचाली करायला जागा नाही.

अशा या संदर्भात सर्व तक्रारी इंदिरानगर व वाल्मिक नगर भादली बु. चे ग्रामस्थांनी माजी सभापती विजय नारखेडे यांच्याकडे व्यथा मांडल्या.

माजी सभापती नारखेडे यांनी सदर ठेकेदाराशी संपर्क साधून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. प्रतीक अग्रवाल हे तेथे उपस्थित असल्यामुळे ग्रामस्थांनी त्याना सांगितले आम्ही हे काम होऊ देणार नाही. तरी माजी सभापती नारखेडे यांनी या संपूर्ण गोष्टीचा कंत्राटदाराकडून आढावा घेऊन ग्रामस्थांना आश्वासन दिले की, या गोष्टीवर त्वरित पत्रव्यवहार करून मी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत सोनावणे यांना संपर्क करून आपल्या या गावांतर्गत साईड पट्याचा विषय त्वरित मार्गी लावतो व ग्रामस्थांना होणार्‍या अडचणी, गावातील गुरे ,गायी, म्हशी,लहान मुलांना होणार त्रास हा लवकर बंद होईल, असे आश्वासन माजी सभापती विजय नारखेडे यांनी दिले व याबाबत नाथाभाऊ यांच्याशी चर्चा करून सदर तक्रारी स्वरूपात निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देतो व याबाबतीत काम न झाल्यास ग्रामस्थांना समजवून सांगितले कि पुढील कार्यवाही आपण सर्व गावातील ग्रामस्थ व मी करेल, असे आश्वासित करून ग्रामस्थांना शांत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या