Sunday, May 19, 2024
Homeजळगावसराफा दुकानात भरदिवसा दरोडा ; लाखोंचे सोने लुटले

सराफा दुकानात भरदिवसा दरोडा ; लाखोंचे सोने लुटले

यावल – Yaval

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल येथील सराफा दुकानावर आज भरदिवसा दरोडा टाकून लाखों रूपयांचे सोने लुटले. गळ्याला पिस्टल लावत दुकानातील सोन्याची लुट केली. इतर व्यापाऱ्यांची सतर्कता परंतु लुटारू मोटरसायकलीने पळाले.

- Advertisement -

शहरात मुख्य रस्त्यावर कोर्टवर रोडवर असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले (Bajirao Kashidas Kavadiwale) यांच्या सराफ दुकानात आज दि.7 जुलै बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून चार जण आलेले लुटारू अचानक सराफ दुकानात घुसून सराफ दुकानाचे मालक जगदीश कवडीवाले यांच्या गळ्याला पिस्तोल लावून बंदुकीचा धाक दाखवून गप्प बसा दुकानात काय रोकड आणि माल आहे तो काढा आणि आमच्या जवळ द्या अशी दमदाटी करायला लागले तेवढ्यात बाहेरील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी मोठा गोंधळ केल्याने अज्ञात चोरटे पळून जाण्यास निघाले असता विरोध करणार्‍या एका व्यापार्‍यावर अज्ञात लुटारूंनी एक गोळी झाडली परंतु तो एक व्यापारी बालबाल बचावला.

यात आलेली चोरटे मोटरसायकलवरून फरार झाले या घटनेमुळे संपूर्ण यावल शहरात आणि व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे दुकानातून किती माल लुटुन नेला? चोरटे कुठले? कुठून आले होते? मेन रोडवर कोणकोणत्या दुकानदाराकड़े सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत इत्यादी चौकशी यावल पोलिसांनी तात्काळ करून लुटारुचा शोध घेऊन लुटारूंना अटक करावी असे बोलले जात आहे.दुपारच्या वेळेस मेन रोडवर किंवा बुरूज चौकात ट्राफिक पोलीस किंवा धार्मिक स्थळाजवळ असलेला पोलिस होमगार्ड बंदोबस्त यांच्या हालचाली लक्षात घेऊन चोरट्यांनी व्यापाऱ्यास लुटण्याचा डाव साधला असल्याचे सुद्धा बोलले जात असून अज्ञात लुटारू हे भुसावळ मार्गे बोरावल गेट दरवाजा भागाकडून आले किंवा बुरुज चौकातून आले किंवा सुदर्शन चित्र मंदिर परिसरातून आले किंवा नगरपालिकेकडून आले का? इत्यादी तपासाबाबत यावल पोलिसांना एक मोठे आव्हान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या