Monday, May 6, 2024
Homeजळगावजळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीचे सूप वाजले; पुन्हा सलवा जुडूम : शांती मार्गावरची...

जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीचे सूप वाजले; पुन्हा सलवा जुडूम : शांती मार्गावरची संघर्षयात्रा!

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या 61 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा 2022-23 अंतर्गत जळगाव केंद्रावर गेल्या 25 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या प्राथमिक फेरीचा समारोप रात्री छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झाला. जळगावच्या आप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानने सादर केलेल्या ‘पुन्हा सलवा जुडूम’ या दोन अंकी नाट्याने समारोप झाला आणि प्राथमिक फेरीचे सूप वाजले. संवेदनशील रंगकर्मी शरद भालेराव लिखीत आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चिंतामण पाटील दिग्दर्शित हे नाटक प्राथमिक फेरीतील तेराव्या क्रमांकाचे नाटक होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात नक्षवाद्यांकडून केल्या जात असलेल्या उत्तर कसे द्यायचे हा व्यवस्थेपुढचा मुख्य प्रश्न होता. त्यावर सुयोग्य तोडगा काढण्यासाठी सलवा जुडूम ही चळवळ उभी राहिली. शांततामय आंदोलन असा सलवा जुडूम शब्दाचा अर्थ होतो. मात्र तत्कालीन या आंदोलनात शांतता कमी आणि हिंसाचाराचे प्रमाणच अधिक होते. काट्याने काटा काढता येतो असा समज करून नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी स्थानिक आदीवासी तरूणांच्या हातात शस्त्रे देण्यात आली. त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. नक्षलवाद्यांपासून गावकर्‍यांची मुक्तता करणे आणि नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देणे या उद्देशाने सुरू झालेल्या या चळवळीला स्वयंस्फूर्त, स्वरक्षणार्थ शांततामय चळवळ अशी विविध नावे देण्यात आली. तरूणांना सशस्त्र करण्यात आले. पण ताकद वाढली की जबाबदारीही वाढते आणि जबाबदारीचे भान राहिले नाही तर परिस्थीती कधी हाताबाहेर जाते हे लक्षात देखिल येत नाही. अगदी असाच तेव्हाच्या या शांततेच्या मार्गाने चालविण्यात येणार्या चळवळीच्याबाबतीत अर्थात ‘सलवा जुडूम’ च्या बाबतीत येतोय. अर्थात खरंतर स्वातंत्र्योत्तर काळातही केवळ आदीवासींसाठीच नव्हे तर देशातील प्रत्येकासाठी अशी शांतीच्या मार्गाने जाणारी पुन्हा सलवा जुडूम चळवळ आहे का? असा सवाल करणारे नाटक म्हणजे पुन्हा…जुडूम होय. प्रामुख्याने जल, जंगल आणि जमीन संस्कृतीत आपल्या मस्तीत सुक्ष्म जीवन जगणार्‍या नक्षलवाद्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न सद्य परिस्थितीतही होतोय परंतू भांडवलशाही आणि दहशतवादी राजकारण्यांचा ढोंगीपणा या आंदोलनाला सुरुंग लावतोय त्यामुळे शांतीच्या मार्गावरील ही संघर्षयात्रा अंधाराच्या दिशेने तर वाट चालत नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो. असंख्य विचारी प्रामाणिक राष्ट्रहीत पाहणार्‍या लोकांना जी सामाजिक समस्या जाणवते तीच शरद भालेराव सारख्या संवेदनशील रंगकर्मीला ही जाणवते आणि ‘पुन्हा सलवा जुडूम’ रंगमंचावर येतो. लेखकाने ही समस्या अचूकपणे हेरली आणि जंगल संस्कृती तिथली माणस संस्कृती तिथली शेली भाषा यांचा अभ्यास करत मांडली ही फक्त पहिल्या अंकात काही लांबलेल्या प्रसंगांना कात्री हवी होती. दिग्दर्शक म्हणून चिंतामण पाटीलांचा अनुभव निश्चितच सादरीकरण सुविहीत आणि संघर्षमय करण्यात कामी आला. फक्त काही कलावंताकडून चोख पाठांतर आणि सफाईदार काम करवून घ्यायला हवे होते. असो.

- Advertisement -

अभिनयाच्या बाबतीत गणेश सोनारांचा आदीवासी पाड्याचा म्होरक्या सुबा लक्ष्यवेधी त्यांचा कायकि व वाचिक अभिनय चांगल्यापैकी. विकास वाघ (किसू), अरुण सानप (सुबा), यांच्याही भूमिका न्याय देणार्‍या मध्यवर्ती भूमिकेतील सीमा झालेल्या एकता असोदेकर यांचाही अभिनय चांगल्यापैकी फक्त निश्चयीपणा करारीपणा संवाद फेकीतून जाणवायला हवा होता. सहभूमिकांत कुलदीप भालेराव (इन्स्पेक्टर राठोड), दिनेश राठोड (हवालदार बांगर), विजय पालवे, आयशा तडवी, सुयोग नेहते, शरद भालेराव (आदीवासी गीत उत्तमचं) नयन खैरनार, इंद्रसिंग वळवी, भरत सोनवणे, यांचा वावर व्यवस्थित. तांत्रिक बाबतीत प्रबुुध्द भालेराव, कुणाल जाधव यांनी रंगमंचावर उभा केलेला आदीवासी पाडा संहितेची गरज पूर्ण करणारा, शिरीष शिरसाळे, संजय पगार (प्रकाश योजना), रोहित पाटील (पार्श्वसंगीत) मिनाक्षी पाटील (रंग व वेशभूषा), तेजस सपकाळे, प्रशांत सुरवाडे, जय भवानी शिक्षण मंडळाचे सहकार्य महत्त्वाचे. थोडक्यात स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी खान्देश नाट्य प्रतिष्ठानची निर्मिती असलेले ‘पुन्हा सलवा जुडूम’ हे नाटक म्हणजे शांतीच्या मार्गाने जाणारी संघर्ष यात्राचं ठरली हे निश्चित!

- Advertisment -

ताज्या बातम्या