Friday, May 3, 2024
Homeजळगावसात महिन्यानंतर जिल्हा वैद्यकीय रुग्णालय पूर्ववत

सात महिन्यानंतर जिल्हा वैद्यकीय रुग्णालय पूर्ववत

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना जिल्हा प्रशानाकडून जिल्हा वैद्यकीय रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषीत केले होते.

- Advertisement -

परंतु सात महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झााल्याने जिल्हा रुग्णालय हे नॉन कोविड म्हणून सुरु झाले. गुरुवारी पहिल्याच दिवशी 133 रुग्णांनी याठिकाणी ओपीडीत तपासणी केल्याने बर्‍याच कालावधीनंतर जिल्हा रुगणालया पुन्हा गजबजलेले दिसून आले.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या कोरोना व्यतिरिक्त सेवांचा (नॉन कोविड) प्रारंभ गुरुवार 17 डिसेंबर रोजी सुरू झाला आहे. सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी निंभोरा ता. रावेर येथील रत्नाबाई एकनाथ भिल (वय-40) यांना पहिला केसपेपर देऊन ओपीडी सुरू करण्यात आली.

यावेळी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर.यु. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ.संजय बनसोडे आदी उपस्थित होते. सकाळी सुमारे दीड तास सर्व विभागांची तपासणी करून अधिष्ठाता, उप अधिष्ठाता व अधिकार्‍यांनी वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेत रुग्णांशी देखील संवाद साधला.

औषधींचा साठा मुबलक प्रमाणात

जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात औषधांचा साठा देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. दिवसभरात स्त्री रोग, बालरोग, अपघात, विषप्राशन, दुखापती, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, नाक-कान-घसा, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, दंतचिकीत्सा, किडनी आजार, प्राण्यांचे चावे, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंग्यू, फुफ्फुस संबंधित, मणका-सांध्याचे आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण आले होते.

अहवाल15 मिनीटात

वैद्यकीय रुग्णालय नॉन कोविड झाल्यानंतर याठिकाणावरील रक्त, लघवी तपासणी विभागही अद्ययावत झाला. याठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल केवळ पंधरा मिनिटात उपलब्ध होत असल्याने रुग्णांनी होणारी हेळसांड कमी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या