Monday, May 6, 2024
Homeजळगावमुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा 213 गावांना लाभ

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा 213 गावांना लाभ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हयातील शेतकर्‍यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी जेथे पारेषण विज पोचू शकत नाही वा उपलब्ध होउ शकत नाही अशा ठिकाणी

- Advertisement -

‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहवालानुसार जिल्हयातील 10 तालुक्यातील 213 गावांसाठी योजना लागू आहे.

भुसावळ, चाळीसगाव, भडगाव, पारोळा, व रावेर तालुक्यातील एकही गाव 60 टक्केंपेक्षा कमी उपशाची स्थिती असलेल्या सुरक्षीत वर्गवारीतील पाणलोट क्षेत्रात येत नसल्याने या तालुक्यातील गावांना सौरकृषि पंप योजना लागू रहाणार नसल्याचे महावितरण सुत्रांनी म्हटले आहे.

शासन निकषानुसार जिल्हयातील ज्या गावांची सुरक्षीत पाणलोट क्षेत्र उपसा स्थिती 60 टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा गावांमधील विहीरीं व कूपनलिकांसाठी नवीन 7.5 अश्वशक्तीचे सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत.

परंतु 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरी वा कूपनलिकांसाठी 7.5 अश्वशक्तीचे सौर पंप देण्यात येणार नाहीत. जिल्हयातील 60 टक्केंपेक्षा कमी उपसास्थिती असलेल्या तालुक्यांची यादी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार 7.5 अश्वशक्तीचे पंपांसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

जिल्हयातील जळगाव व धरणगाव तालुके 60 टक्क्यांपेक्षा कमी उपसा स्थिती असलेल्या सुरक्षीत वर्गवारीतील पाणलोट क्षेत्रात येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या