Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedकोरोना संशयित महिलेचा अहवाल निगेटिव्ह

कोरोना संशयित महिलेचा अहवाल निगेटिव्ह

जळगाव  – 

शहरातील कांचननगरामधील कोरोना संशयित ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजता जिल्हा रुग्णालयात झाला होता. या महिलेचा अहवालही मंगळवारी निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील या महिलेला १० रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला न्युमोनियाचा त्रास होता.

- Advertisement -

मेहरुणमधील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतर घेण्यात आलेल्या फेरतपासणीतील पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर दुसर्‍या फेरतपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. या रुग्णाचे फेरतपासणीतील किमान दोन अहवाल निगेटिव्ह येणे गरजेचे आहे. हे दोघं अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याची प्रकृती लक्षात घेवून त्यास घरी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तो घरी गेल्यास त्यास १४ दिवस होमक्वारंटाइन राहणे सक्तीचे आहे.

यासंदर्भात त्याच्यावर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस लक्ष ठेवून राहतील, असेही  डॉ.विलास मालकर यांनी दिली.

बाळांचे अहवालही निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयात १२ व १३ एप्रिल रोजी स्वॅब घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णापैकी १० व्यक्तींचे तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले आहेत. सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या अहवालामध्ये पुणे येथील रहिवासी एक दिवसाच्या बाळाचा, बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) येथील सहा महिन्याच्या बाळाचा, मलकापूर येथील ६२ वर्षीय महिलेचा, तर रावेर येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.

उर्वरित संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या