Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव : 35 नवे बाधित रुग्ण तर 41 जण करोनामुक्त

जळगाव : 35 नवे बाधित रुग्ण तर 41 जण करोनामुक्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज 6 जानेवारी रोजी कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण करोनाबाधितांची संख्या 56 हजार 124 एवढी झाली आहे.

- Advertisement -

दिवसभरात एकाही दोन बाधिताचा मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे 41 जण कोरोनामुक्त झाले आहे . चाळीसगाव, मुक्ताईनगर ,बोदवड या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत 54 हजार 317 जणांनी कोरोनावर मात केली आहे . तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 333 एवढ्या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 8, जळगाव ग्रामीण 1, भुसावळ 7, अमळनेर 5, चोपडा 2, पाचोरा 2, भडगाव 1,

धरणगाव 1, यावल 1, एरंडोल 2, जामनेर 2, रावेर 2, पारोळा 1 असे एकूण 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी दिवभरात भुसावळ तालुक्यातील 1 आणि जळगाव तालुक्यातील एक याप्रमाणे 2 बाधिताचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या