Thursday, May 2, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील 'या'आठ खाजगी रुग्णालयांना नोटीस

जिल्ह्यातील ‘या’आठ खाजगी रुग्णालयांना नोटीस

जळगाव – Jalgaon :

करोनाबाधित रुग्णांवर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेत उपचार करण्याबाबतचा करार असतांनाही, योजनेत उपचार न करता कराराचा भंग करत बाधित रुग्णांवर प्रायव्हेटअंतर्गत उपचार करुन खर्च घेणार्‍या जिल्हयातील कोवीड सेंटर म्हणून मान्यता देण्यात आलेल्या आठ रुग्णालयांना आज सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

यात पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल, चोपडा येथील नृशिंह हॉस्पिटल, चाळीसगाव येथील बापजी जीवनदीप हॉस्पिटल व कृष्णा क्रिटीकर केअर, जामनेर येथील जी.एम. हॉस्पिटल, जळगाव येथील आश्‍विनी हॉस्पिटल, महाजन हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल या आठ रुग्णालयांचा समावेश आहे.

नोटीस मिळताच तीन दिवसात खुलासा सादर करावा तसेच पुढील आठवड्यात सुधारणा न दिसल्यास तसेच योजनेअंतर्गत कोवीड रुग्णांना मोफत उपचार न मिळाल्यास आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही नोटीसव्दारे देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या