Sunday, May 19, 2024
Homeजळगावकरोनाबाधितांचे प्रमाण घटले

करोनाबाधितांचे प्रमाण घटले

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्यासह देशभरात करोनाने हाहाकार माजविला आहे. काही दिवसांपासून बाधितांसह मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

- Advertisement -

तसेच रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. मात्र आता दुसर्‍या लाट ओसरत असून शहरातील आरोग्य यंत्रणेतील सुमारे हजारपेक्षा अधिक बेड शिल्लक आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना आरोग्य यंत्रणेवरील भार हलका झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून देशभरात करोनाने हाहाकार माजविला आहे. पहिली लाट ओसरत नाही तोच फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेंटची दुसर्‍या लाटेचे संकट देशावर निर्माण झाले. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय वेगाने पसरल्याने देशभरातील आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने आपली यंत्रणा लावत करोनाबाधितांवर उपचार करण्यास सुरुवात केली.

देशभरात अद्याप देखील कोरोनाचे संकट टळले नसून बाधित रुग्णांसह मयतांच्या संख्या देखील कमी होत नाही आहे. यातच गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला आहे. जिल्ह्यात देखील बाधित रुग्णांची संख्या घटली असून दिवसाला हजारपेक्षा अधिक बाधत रुग्ण आढळून येत होते.

मात्र आता तीच निम्म्यावर येवून ठेपल्याने जिल्हावासीयांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून येत होते. परंतु आता जळगाव शहरात बाधित रुग्णांची संख्या ही पन्नाशीच्या आत असल्याने मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील आता एकवर येवून ठेपली आहे.

बेड नियंत्रण कक्षामुळे समाधानकारक स्थिती

गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांच्या संख्ये प्रचंड वाढ होवू लागली होती. त्यामुळे शहरात रुग्णांना उपचारासाठी एकाही रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे भयानक चित्र निर्माण झाले होते. अशा परिस्थिती जिल्हाधिकार्‍यांनी बेडच्या नियोजनासाठी बेड नियंत्रण कक्षाची स्थापना करीत बेडचे नियोजन केले.

दरम्यान आता शहरातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असून शहरात हजारपेक्षा अधिक बेड शिल्लक असल्याची समाधानकार स्थिती आज शहरात आले.

शहरातील खासगीसह शासकीय रुग्णातील बाधित रुग्णांच्यासंख्येत घट झाली आहे. यामध्ये विना ऑक्सिजनचे 156, ऑक्सिजनचे 594, आयसीयू 179, व्हेंटीलेटर तर बायपॅकचे 44 असे एकूण 982 बेड शिल्लक आहेत.

त्रिसूत्रीमुळे रुग्णसंख्या आटोक्यात

जिल्हा प्रशासनासह मनपा प्रशासनाकडून दुसर्‍या लाटेत बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा तात्काळ शोध घेवून त्यांचे तात्काळ निदान व तात्काळ उपचार ही पद्धती अवलंबविण्यात आली.

या त्रिसूत्रीचा वापर केल्यामुळे शहरात बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे. गेल्या आठवड्याभरात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या ही दोन पट अधिक आहे. तसेच मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील घटल्याने ही जळगाव शहरवासीयांसाठी समाधानाची बाब मानली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या