जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
जिल्ह्यात शनिवारी पुन्हा नव्याने 59 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 54 हजार 048 इतकी झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
- Advertisement -
शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 27, जळगाव ग्रामीणमधील 01, भुसावळ येथील 11, अमळनेरातील 03 , चोपडा येथील 00, पाचोरा येथील 00, भडगावातील 00, धरणगाव 00, यावल येथील 04, एरंडोल येथील 00, जामनेरातील 03, रावेर येथील 03, पारोळा येथील 04, चाळीसगावमधील 00, मुक्ताईनगरातील 00, बोदवड येथील 01, परजिल्ह्यातील 02 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 52 हजार 365 रुग्ण करोनामुक्त झाले. यातील 35 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
सध्या 292 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.