Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात आढळले 54 करोनाबाधित रुग्ण

जळगाव जिल्ह्यात आढळले 54 करोनाबाधित रुग्ण

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नव्याने 54 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 54 हजार 643 इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

- Advertisement -

बुधवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 14, जळगाव ग्रामीणमधील 00, भुसावळ येथील 12, अमळनेरातील 00 , चोपडा येथे 1, पाचोरा 00, भडगावातील 00, धरणगाव 04, यावल येथील 01, एरंडोल येथील 00, जामनेरातील 00, रावेर येथील 01, पारोळा येथील 05, चाळीसगावमधील 06 , मुक्ताईनगरातील 06, बोदवड येथील 01, परजिल्ह्यातील 03 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 52 हजार 830 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 44 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 511 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बुधवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात एका तर गुणपती हॉस्पीटल येथे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्यात जळगाव शहरातील 50 वर्षीय महिलेचा व भुसावळ तालुक्यातील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या