Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमEknath Khadse : माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी; सुमारे दहा...

Eknath Khadse : माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी; सुमारे दहा तोळे सोने आणि रोकड लंपास

जळगाव | Jalgaon

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर दरोडा पडून काही दिवस उलटत नाही तोवरच राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या शहरातील शिवराम नगर भागातील निवासस्थानी चोरीची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

- Advertisement -

आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील (Jalgaon) ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याने राजकीय नेत्यांची घरेही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्याला कुलूप होते. आज सकाळी खडसे यांच्याकडील कर्मचारी १ बंगल्यावर आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात प्रवेश करून पाहिले असता, सामान अस्ताव्यस्त आढळले. या प्रकाराची माहिती खडसे यांना देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांना (Police) माहिती दिली.

YouTube video player

दरम्यान, पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे (Muktai Banglow) धाव घेतली असून, पंचनामा करण्याची आणि तपास करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका मोठया राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीत नेमके किती नुकसान झाले आहे याची माहिती पोलिसांच्या तपासानंतरच समोर येईल. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

घटनेनंतर एकनाथ खडसे काय म्हणाले?

आमदार खडसे यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, घरातून ३५ हजाराची रोकड आणि सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. तसेच खाली आमचे नातेवाईक राहत होते, त्यांचेही पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते. तसेच पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सडकून टिका केली.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...