Thursday, May 2, 2024
Homeजळगावजळगाव : चांगदेव येथील तरुणाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

जळगाव : चांगदेव येथील तरुणाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

जळगाव –  मुक्ताईनगर तालुक्यातील सुनील भागवत तारू (वय ४०) या तरुणाचा मृत्यू केवळ पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई व्हावी. तसेच भाऊबंदकीच्या वादातून त्रास देणार्‍या काका, काकू, आत्या व फुवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका या मृत तरुणाच्या नातेवाईकांनी घेतली. त्यासाठी त्यांनी रविवारी सकाळपासूनच जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
सुनील तारू या तरुणाविरुद्ध काही वर्षांपूर्वी काकाने हाणामीरीची फिर्याद दिली होती. याबाबत प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सुनील तारखेवर हजर झाला नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध न्यायालयाने अटक वारंट बजावले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना १ मार्च रोजी शेतातून अटक केली होती. भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली होती. त्यांंना शेतातून अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवले नव्हते.तसेच या प्रकरणातून ते निर्दोष झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला पत्र देवून ते निघून गेले होते. तोपर्यंत तरुणाच्या घरच्यांना माहित नव्हते. त्यानंतर ते कारागृहात असल्याचे नातेवाईकांना कळाले होते. परंतु, ते कारागृहानंतर जिल्हा रुग्णालयात असल्याचेही समजले. त्यांची आई गुंफाबाई तारू, पत्नी, बहीण, मेहुणे यांनी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी धाव घेतली होती. त्या वेळीही नातेवाईकांनी पोलिसांवर आक्षेप घेतले होते. त्यानंतर शनिवारी तरुणाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. जिल्हा रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या