जळगाव –
शहरातील फुले मार्केट हॉकर्स बांधवांनी मनपासमोर ठिय्या मांडला. यावेळी हॉकर्स मोठ्या संख्येने मनपा प्रांगणात उपस्थित होते. यावेळी हॉकर्स बांधवांनी आयुक्तांकडे आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले.
फेरीवाला धारणानुसार आम्हाला कायमस्वरुपी व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी असेही या हॉकर्सचे म्हणणे आहे. त्यानंतर मात्र अद्याप तीन आठवडे उलटल्यानंतरही फुले मार्केट हॉकर्स बांधवांना तेथे परत बसू दिले जात नसल्याने हॉकर्स बांधवांनी काल बुधवारी मनपात मोठ्या संख्येेने ठिय्या मांडला होता.
तत्पूर्वी काल सकाळी फुले मार्केटमध्ये जे हॉकर्स बजावल्यानंतर ही पुन्हा बसले होते अशांवर कारवाई करीत त्यांचे साहित्य मनपा अतिक्रमण विभागाने जप्त केले होते. तसेच बी. जे. मार्केटमधूनही हॉकर्स बांधवांवर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई करीत तेथील साहित्य जप्त करुन आणले होते.
यानंतर मात्र दोघा मार्केटमधील हॉकर्स धारकांंनी काल मनपात येवून ठिय्या मांडला होता. गेल्या 15 दिवसापासून आमचा रोजगार बुडाल्याचे हॉकर्स बांधवांनी बोलून दाखविले.
आयुक्तांना दिले निवेदन
तत्पूर्वी हॉकर्स बांधवांनी तास दीड तास ठिय्या मांडल्यानंतर हॉकर्सनी आयुक्तांना निवेदन दिले. आम्हाला बसायला परवानगी द्या अशी मागणी पुन्हा हॉकर्स नी दिले. यावेळी हॉकर्सचे एक शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीस गेेले होते. यावेळी नंदू भावसार, मनोज चौधरी, रविंद्र चौधरी, गोपाल कटारीया, गोविंद कुंभार, राजेंद्र नन्नवरे व इतर हॉकर्स उपस्थित होते.