Thursday, May 2, 2024
Homeजळगावअतिक्रमणावरुन शाब्दीक खडाजंगी

अतिक्रमणावरुन शाब्दीक खडाजंगी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी:

शहरातील आरटीओ कार्यालयाच्या गेट परिसरात एजन्टांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते.

- Advertisement -

महापालिका अतिक्रम विभागाचे पथक दुपारी 1.25 वाजेच्या सुमारास गेले असता अतिक्रमण पथकातील कर्मचारी आणि अतिक्रमणधारक एजन्ट यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बेधडक भूमिका घेत आरटीओ कार्यालयासमोरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

या कावाईमुळे आरटीओ कार्यालयाचा परिसर मोकळा श्वास घेत आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका अतिक्रमण विभागाकडून रस्त्याच्या बाजूंवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु आहे.

काँगे्रसचे शहर चिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी आरटीओ कार्यालयासमोरील हटविण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली होती. त्यांच्या निवेदनाची दखल मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरुवारी कारवाई केली.

या कारवाई दरम्यान एजन्ट व मनपा पथकाचे कर्मचारी यांच्यात शाब्दीक वाद होऊन चांगलीच खडाजंगी रंगली. जळगाव आरटीओ कार्यालय परिसराजवळील एजन्टांचे अतिक्रमण गुरुवारी काढण्यात आले. त्यामुळे हा परिसर मोकळा झाला असून या रस्त्याने वाहनधारकांची होणारी कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

या मोहिमेत उपायुक्त संतोष वाहुळे, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक ईस्माइल शेख, संजय ठाकूर, नाना कोळी, सुनील पवार, राहुल कापरे, वैभव धर्माधिकारी, किशोर सोनवणे आदींचा समावेश होता.

विनामास्क धारकांवर कारवाई

महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरातील बहिणाबाई उद्यान ते आरटीओ कार्यालय परिसरात विना मास्कधारकांवर कारवाई करण्यात आली. यात दहा जणांकडून 200 रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तसेच रस्त्यांवर गर्दी करु नये, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

मनपातर्फे आहवान करुनही शहरात अनेक नागरिक विनामास्क फिरतांना दिसून येतात. एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गहीरे होत असतांनाच नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही

- Advertisment -

ताज्या बातम्या