Monday, May 6, 2024
Homeशब्दगंध‘कोरोना’ को ‘डरो’ ना!

‘कोरोना’ को ‘डरो’ ना!

जळगाव
प्रासंगीक-शिवलाल बारी

आज सारं जग कोणत्या गोष्टीमुळे हादरून गेलं आहे? खरं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत आहे! ‘कोरोना – कोरोना!!’ सारं जग कोरोनाने प्रचंड हादरून गेलं आहे! कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनसह अन्य काही देशातील 4300 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. चीन मधील वुहान प्रांतापासून सुरू झालेले हे कोरोना व्हायरस – कोविड 19 चे थैमान भारतासह तब्बल 100 देशांपर्यंत पोहोचले आहे! हे कमी आहे म्हणून की काय, कच्च्या देलाच्या किंमतीत फार मोठी घट आल्याने जागतिक शेअर बाजारात जबरदस्त आर्थिक भूकंपच जणू झाला आहे. शेअर्सच्या किंमती कमी होवून मुंबईतील शेअर बाजार 1942 अंकांनी घसरला! यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे 6 लाख 84 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले! असो, कोरोना महामारी घोषित झाली हे विशेष!

- Advertisement -

कोरोना व्हायरस
चीनमधील वुहान प्रांतात कोरोना व्हायरस (2019 एन.सी.ओ.व्ही.) चा प्रकोप झाला, प्रचंड व दाट लोकसंख्येने गजबजलेला हा प्रांत असंख्य उद्योग धंद्यांनी गजबजलेला आहे. चीनचे सर्वात मोठ्या सायंटिफिक रिसर्च सेंटर असलेल्या ठिकाणी कोरोना पसरला असे मानले जाते पण चीनने या गोष्टीचा तातडीने इन्कार केला होता. कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोविड 19’ असे नामकरण केले आहे. या नवीन कोरोना -कोविड 19 चा जिनोम अन्य कोरोना व्हायसांपेक्षा बराच मोठा आहे. मोठ्या आकाराचा हा व्हायरस मानला जातो.

अर्थात याच्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. कोरोना या नव्या व्हायरसच्या प्रारंभिक अभ्यासावरून लक्षात आले की, कोरोना व्हायरस हा काही तास ते काही दिवस जिवंत राहू शकतो! अर्थात हा अवधि वेगवेगळ्या स्थितीत (म्हणजे पृष्ठभूमीचा प्रकार, तपमान, वातावरण) वेगवेगळा असू शकतो. काही डॉक्टरांच्या मते हा व्हायरस मोठा व्हायरस आहे. 8-9 फूट अंतरावर असेल तर कोरोनाचा व्हायरस हवेच्या माध्यमातून त्या दूर उभ्या असलेल्या व्यक्तिपर्यंत पोहोचणार नाही! तो व्हायरस शरिरातील द्रव-तरल द्रव्याच्या माध्यमातून खाली पडेल! यामुळे हवेच्या माध्यमातून या कोरोना व्हायरसचे संक्रमण बरेचसे कमी होण्याची शक्यता डॉक्टरांना वाटते! जर एखादी व्यक्ति संक्रमित जागेस स्पर्श करील व तोच हात चेहर्‍यास अथवा अन्नास स्पर्श करून नंतर हात न धुताच ते अन्न खाईल तर त्यास कोविड-19 लागेल! याच अत्यंत महत्त्वाच्या कारणामुळेच जागतिक आरोग्य संघटना () आणि भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय नागरिकांना स्वच्छता राखण्याचे, सतत आवाहन करीत आहे. जेवणाआधी हात साबणाने धुवा, दुषित अन्न व अस्वच्छ वातावरण टाळा, स्वच्छता बाळगा असे आवाहने दूरदर्शन, विविध चॅनेल, वृत्तपत्रांमधून केली जात आहेत.

असा पसरू शकतो कोरोना व्हायरस
खरं तर आपल्या हाताला किती घाण बिलगलेली असते याची किती लोकांना जाणीव असते? जेवणाआधी दोन्ही हात मनापासून नळाच्या पाण्याखाली जोरात रगडून पहा म्हणजे दिसेल खरे तर हा कोरोना व्हायरस अशाच दुषित घाणयुक्त हातांद्वारे पसरतो आणि जी व्यक्ति आपल्या अशाच अस्वच्छ, घाणेरड्या हाताचा स्पर्श जेवणाचा डबा, बॉलपेन, पाण्याचे ग्लास, फोन, टेबल, प्रवासात बर्थ, समोरचे सीट अशा गोष्टींना करील तर त्याद्वारे कोरोना व्हायरस पसरण्याचा मोठा धोका असतो. आणि असा प्रसार गर्दीच्या ठिखाणी, यात्रा, पर्यटनस्थळे रेल्वे प्रवास, लोकलमधील गर्दी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात होवू शकतो. त्यामुळ क्रिकेटसह क्रिडा क्षेत्रातील अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत.

तर अनेक कार्यक्रम पुढे ढकलले जात आहेत. भारतासह विविध देशातील पर्यटनाला तर प्रचंड गळती लागली आहे. हजारो पर्यटनस्थळी नेहमी दिसणारी गर्दी कोरोनाच्या भितीमुळे ओसरली आहे. रेल्वे प्रवास विमानप्रवासातील गर्दी कमी झालेली दिसते. भारताचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अन्य देशांच्या तुलनेने कोरोनाचा भारतातील प्रसाराचा वेग खूपच धीमा आहे. परंतु प्रत्येकाने सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. कोरोनाबद्दल अधिक विचार करावयाचा तर इतिहासात न डोकावणे चूक ठरेल! कारण शेकडो हजारो वर्षापूर्वीही कृमि -जंतुंचा उल्लेख तत्कालीन ग्रंथात सापडतो!

व्हायरस – कृमि
व्हायरस म्हणजे कृमि, जंतु! या जंतुंचा आकार वेगवेगळा असतो. हे जंतु-कृमि अत्यंत सुक्ष्म असतात. प्राचीन भारताचा विचार केला तर प्राचीन ग्रंथांचा विचार करावाच लागेल! भारतात 4 वेत 18 पुराणे अत्यंत मौल्यवान मानले जातात. त्यातील अथर्व वेदास आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे. सुमारे 4000-5000 वर्षापुर्वीच्या काळी तत्कालीन ऋषिमुनी तपश्चर्या करीत. वनस्पतींना जागृत करून त्यांचा उपयोग रोगांचा नाश करण्यासाठी कसा करता येईल याचे ज्ञान मिळवून ते विविध ग्रंथाद्वारे त्यांनी लिहिले. अथर्व वेदास आयुर्वेदाचे उपांग मानले जाते. रोगाचे कारण कृमि असतात. असे अथर्व वेदात म्हटले आहे. कृमिस ‘यातुधान’ म्हटले आहे. ज्वरदेखील कृमिपासूनच होतो. हे कृमि अन्न, जल, दूध आदी पदार्थात प्रवेश करून शरीरात जातात आणि तेथे रोग निर्माण करतात असे अथर्ववेद सांगतो. याच अथर्ववेदात शरीरातील महत्त्वाचा अंगांचा उल्लेख केला आहे. पुरूष शुक्राने संतान परंपरा निर्माण होत असल्याचाही उल्लेख आहे.

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या माहितीवरून कोरोना कृमि संसर्गाने होणारी श्वास कष्टता, ताप, सर्दी, खोकला वगैरे लक्षणे आयुर्वेदानुसार जवळपास विषमज्वरासारखी वाटतात. आतापर्यंत कोरोना वर कोणतेही औषध अथवा लस संशोधित होवून बाजारात उपलब्ध झालेली नाही. कोरोना ग्रस्तांवर केवळ रोगप्रतिबंधात्मक आणित त्यांच्या लक्षणानुरूप औषधोपचार केले जात आहे. भारत सरकार या दृष्टीने आवश्यक ती केंद्र सुरू करीत आहे. केरळ राज्याने प्रतिबंध उपचार देखरेखीबाबत लक्षणीय आघाडी घेतली आहे. भारतात ही प्राचीन अशा भारतीय आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्वपूर्ण औषधी वापरून ‘कोरोना’ को नही डरना!’ असे सांगत कोरोनास प्रतिकार करता येवू शकतो! सदाचरण आचरण रसायनानेही रोगप्रतिकार होण्यास मदत होईल!

आपल्या देशात प्लेग येवून गेला चिकनगुनियालाही भारतीयांनी यशस्वीरितीने परतवले. आता पाळी आहे ती कोरोना कृमिंना निष्प्रभ करण्याची? त्यादृष्टीने आयुर्वेद क्षेत्राने धाडसाने पुढे यावे! कारण आयुर्वेदात जीर्णज्वर, विषमज्वर, क्षय, सर्दी, खोकला, ताप, दमा, दुर्बलता नाशक भाग अशा अत्यंत परिणामकारक अशी सुवर्णभस्मयुक्त सुवर्णवसंत मालती (भैषज्य रतनावली) (615 मि.ग्रॅ. व मधासह 203 वेळा) तसेच जयमंगल रस (मधासह), ज्वरांकुश रस (1-2 गोळ्या मधासह ) तापापूर्वी 1-2 तासाआधी 1-1 गोळी देवून वरून तुळशीपाने 8, काळी मिरी 5, जीरे 2 ग्रॅम पाण्यात वाटून द्यावे.) विषमज्वरांतक लोह 1-2 गोळी मधासह महामृत्युंजय रस (भै.र.ज्वराधिकार) 1-2 गोळी मधासह किंवा गरम पाण्याबरोबर, सुदर्शन चुर्ण (भावप्रकाश) पाण्याबरोबर, अशी या रोगावर औषधी उपलब्ध आहेत. याच बरोबर इतरही औषधी आहेत. विशेष म्हणजे सहजोपचार! सध्या शहरात अनेक लोकांच्या घरासमोर पारिजातकाची झाडे असतात.

लालसर रंगाची दांडी असलेली 5 पाकळ्यांची पारिजातकाची फुले खुप सुगंधी असतात. या पारिजातकाची 1-2 पाने स्वच्छ पाण्याने धुवावीत व त्या पानांचा रस प्युवर मधासह दिवसातून 3-4 वेळा द्यावा. सागरगोटीच्या पानांचा (15 ते 20 पाने) तीन धुवून घ्यावीत. उकळून काढा करावा. 4 ते 6 तासांच्या अंतराने ताजा काढा पाजावा. 2-3 दिवसात विषमज्वर जातो. गुळवेलीचा काढाही राम बाण उपाय आहे. मात्र गुळवेल कडू निंबावरची घ्यावी. अर्थात आयुर्वेदातील तज्ञ मंडळी लक्षणानुसार वात ज्वर वातपित्तज्वर, कफपित्त ज्वर वगैरे नुसार उपचार करतीलच! फक्त आपले पाय आयुर्वेदाकडे वळले तर ही औषधी आपणास निरोगी ठेवतील हे खरेच! श्वास कष्ट असेल तर श्वास कुठार रस, अभ्रक भस्म (100 पुटी) कासारी रस, श्रृंग भस्म (मधासह), कफकुठारस अडुळसा घन अशी अनेक औषधी आहेत. आयुर्वेद समृध्द आहे. आणि आजच्या ऐन आणिबाणीत 5-50 हजाराची परकीय कंपनीची 1-1 गोळी घेण्यापेक्षा भारतातच तयार झालेली आयुर्वेदिक अर्थशास्त्र आपल्याच हाती आहे.
– ज्येष्ठ पत्रकार व आयुर्वेदाभ्यासक, जळगाव
मो.९४२०३४९७९०

- Advertisment -

ताज्या बातम्या