Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रJalna Accident : महिलेचा कारमध्ये होरपळून मृत्यू; घटनेला वेगळं वळण, पती जेरबंद

Jalna Accident : महिलेचा कारमध्ये होरपळून मृत्यू; घटनेला वेगळं वळण, पती जेरबंद

जालना | Jalna

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी जालन्यात एका विचित्र अपघाताची चर्चा चांगलीच रंगली होती. गाडीला मागून धडक दिल्यामुळे पती वाद घालण्यासाठी गाडीतून खाली उतरला आणि तेवढ्यात गाडीने पेट घेतला होता. त्यामध्ये पत्नीचा गाडीत होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. मृत महिलेच्या पतीला मंठा पोलिसांकडून (Mantha Police) अटक करण्यात आली आहे…

महिलेचा मृत्यू अपघाती नसून पतीनेच तिच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळेच पोलिसांनी पतीला अटक केल्याची माहिती मिळत आहे.

”विकेट गेलेला माणूस…”; शरद पवारांचे फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला प्रत्युत्तर

जालना जिल्ह्यातील तळणी फाटा येथे एका गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने एका 33 वर्षीय महिलेचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याची घटना घडली होती. पहाटे 4 च्या सुमारास पती-पत्नी दर्शनासाठी शेगाव येथून गावाकडे परत येत होते. तेवढ्यात रस्त्यातच स्विफ्ट कारला मागून एका पीकअपने धडक दिली.

पिकअप वाल्याशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि तेवढ्यात गाडीने पेट घेतला असल्याची माहिती मिळाली होती. आग लागली तेव्हा पत्नी गाडीत होती. वेळत आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आले.

मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीसांच्या भूमिकेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही काळ तुम्ही…”

पोलिसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कारमधील सविता सोळुंके (33) या महिलेचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत होते. पोलीस तपासात अपघात झाला नसून पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या