Thursday, February 5, 2026
HomeनगरJamkhed Crime News : शेतीच्या वादातून पुतण्यांनी केला चुलत्याचा खून; जामखेड तालुक्यात...

Jamkhed Crime News : शेतीच्या वादातून पुतण्यांनी केला चुलत्याचा खून; जामखेड तालुक्यात खळबळ

जामखेड । तालुका प्रतिनिधी

शेतातील सामाईक पाईपलाईन फुटल्याचे कारणावरून जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे दोन पुतण्यांनी विळा व दगडाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

मयताची पत्नी रंजना बळीराम (राळेभात, रा. राळेभात वस्ती, भुतवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत सखाराम राळेभात व योगेश सखाराम राळेभात रा. राळेभात वस्ती, भुतवडा या दोन पुतण्यान विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

याबाबत माहिती अशी की फीर्यादी यांचे पती व दीर या दोन भावा भावांमध्ये शेतीचा वाद सुरू आहे. मागिल एक वर्षांपासून या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल आहे. शुक्रवार दि २७ जुन रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी हनुमंत सखाराम राळेभात व योगेश सखाराम राळेभात हे शेतात आले व सामाईक असलेली पाण्याची मोटार चालु करु लागले. यावेळी त्यांचे मयत चुलते बळीराम राळेभात यांनी सांगितले की तुम्ही आधी आमच्या शेतात जी पाईपलाईन फुटली आहे ती दुरुस्त करा व मगच पाण्याची मोटार चालु करा. असे आरोपींना म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी पुतण्या हनुमंत सखाराम राळेभात याने शेतातील विळा घेऊन आपल्या चुलत्यास म्हणाल की मी जेल मध्ये जाईल पण तुला सोडणार नाही असे म्हणून विळ्याने हतावर, पोटावर, व पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले.

दोन्ही आरोपींनी फीर्यादीच्या हातावर देखील विळ्याने वार करून जखमी केले. एवढ्यावरच आरोपी थांबले नसुन त्या दोघांनी त्या ठिकाणी पडलेला दगड उचलुन फीर्यादी पतीच्या तोंडावर मारुन जखमी केले. याघटनेत दोघे चुलता व चुलती गंभीर जखमी झाल्याने त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चुलते बळीराम राळेभात यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज सकाळी गंभीर जखमी झालेले चुलते बळीराम राळेभात यांचा अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असुन त्यांना शनिवारी सकाळी खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्य़ात न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र दुसर्‍या दिवशी जखमीचा मृत्यू झाला असल्याने पुन्हा या घटनेत वरील दोन आरोपींन विरोधात खुनाचा गुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...