Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशJammu and Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला! डॉक्टरासह ७ जणांचा मृत्यू

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये भ्याड दहशतवादी हल्ला! डॉक्टरासह ७ जणांचा मृत्यू

जम्मू | Jammu

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाही हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. अनेकदा दहशतवादी आणि भारतीय जवानामध्ये चकमकीच्या घटनाही समोर आल्या आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन जवानाचं अपहरण केल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार करत सात जणांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मरण पावलेल्यांमध्ये दोन अधिकारी आणि तीन मजुरांचा समावेश आहे. याशिवाय एका स्थानिक डॉक्टरचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय आणि SKIMS श्रीनगरमध्ये दाखल करण्यात आले आहे. बोगद्याचे बांधकाम सुरु असताना हा भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने परिसरात नाकाबंदी केली आहे.

दरम्यान, सदर भागांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली असली करीही केंद्रीय गृहविभाग आणि केंद्र शासनाच्या वतीनं या भागात तैनात असणाऱ्या लष्करी आणि संरक्षण यंत्रणांना कारवाईची मुभा देण्यात आल्यामुळं आता या दहशतवाद्यांना नेमकं कसं प्रतु्यत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...