Saturday, October 5, 2024
Homeक्राईमजामनेर पोलीस स्टेशन हल्ला प्रकरण : आरोपींची धिंड काढून कोर्टात केले हजर

जामनेर पोलीस स्टेशन हल्ला प्रकरण : आरोपींची धिंड काढून कोर्टात केले हजर

जामनेर – प्रतिनिधी jamner
दि.20 जून रोजी जामनेर पोलीस स्टेशन व पोलीसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेल्या 21 आरोपींची धिंड काढून पोलीस कस्टडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती चामले यांनी सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.

सर्व आरोपींची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान या गुन्ह्याचा तपास एलसीबी पोलीस निरीक्षक बबन राव आव्हाड यांच्याकडून काढून घेण्यात आला असून जामनेरचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.

- Advertisement -

या हल्ल्यांमध्ये हजार दिड हजार लोकांचा जनसमुदाय असतांना आतापर्यंत 300 ते 400 अज्ञात हल्लेखोरावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एकूण 22 आरोपी आतापर्यंत पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याचा तपास एलसीबीचे अधिकारी कुठेतरी राजकीय दबावाखाली करीत असल्याचे बोलले जात होते. यामुळे स्थानिक पोलीस मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत असल्याने व त्यांची राजीनामा देण्याच्या मानसिकतेमुळे पुन्हा हा तपास स्थानिक पोलिसांकडे देण्यात आला आहे असे समजते.

दरम्यान या गुन्ह्यातील नंबर एकचा आरोपी शालू सिंग शेवाळे हा अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या