Tuesday, February 3, 2026
HomeमनोरंजनJay Dudhane Arrested: 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक;...

Jay Dudhane Arrested: ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक; काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

मुंबई । Mumbai

मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आपल्या पिळदार शरीरयष्टीने आणि ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. जयला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले असून, यामुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी हादरली आहे.

- Advertisement -

जय दुधाणे हा केवळ अभिनेता नसून तो एक व्यावसायिकही आहे. ठाण्याचा रहिवासी असलेल्या जयवर जिम व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयने जिम व्यवसायासाठी बनावट कागदपत्रे तयार केली आणि एकाच दुकानाची विक्री अनेक वेगवेगळ्या व्यक्तींना केली. या बेकायदेशीर व्यवहारातून त्याने गुंतवणूकदारांची सुमारे ५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

YouTube video player

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये केवळ जयचे नाव नसून त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश आहे. पोलिसांनी जयच्या आई, बहीण, आजी आणि आजोबा यांचीही चौकशी सुरू केली आहे. फसवणुकीच्या या मोठ्या प्रपंचात कुटुंबातील इतर सदस्यांचा किती सहभाग आहे, याचा तपास सध्या ठाणे पोलीस करत आहेत. विमानतळावरून ताब्यात घेतल्यानंतर जयला न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

जय दुधाणेच्या अटकेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच, २४ डिसेंबर २०२५ रोजी जयने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र, लग्नाच्या आनंदात असतानाच अवघ्या १० दिवसांत ही कारवाई झाल्याने हर्षला आणि जयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या सुखी संसाराला गालबोट लागले असून ही घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट ठरली आहे.

जय दुधाणेने ‘स्पिट्सविला १३’ या रिअलिटी शोमधून आपल्या करिअरची यशस्वी सुरुवात केली होती. या शोचा तो विजेता ठरला होता. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी ३’ मधील त्याच्या खेळीमुळे तो घराघरात पोहोचला. ‘गडद अंधार’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यांसारख्या मोठ्या मराठी चित्रपटांतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मात्र, ५ कोटींच्या या फसवणूक प्रकरणामुळे त्याच्या अभिनय कारकिर्दीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चित्रपटसृष्टीतील त्याची प्रतिष्ठा आणि आगामी प्रकल्पांवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...