Thursday, November 7, 2024
Homeराजकीयजयंत पाटील, अमोल कोल्हे अन् रोहिणी खडसे क्रेनमधून पडता पडता वाचले; नेमकं...

जयंत पाटील, अमोल कोल्हे अन् रोहिणी खडसे क्रेनमधून पडता पडता वाचले; नेमकं काय घडलं?

जुन्नर । Junnar

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) (NCP Ajit PAwar) राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत.

- Advertisement -

तर दुसरीकडे शरद पवार गटानेही (NCP SP) शिवस्वराज्य यात्रेला (Shivswarajya Yatra) आजपासून सुरूवात केली आहे. मात्र शिवस्वराज्ययात्रेच्या सुरुवातीलाच मोठा अपघात (Accident) होता होता वाचला आहे.

शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून खासदार अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घातल्यासाठी एका क्रेनला लोखंडी ट्रॉली जोडण्यात आली होती.

या ट्रॉलीमध्ये जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबुब शेख हे चौघे उपस्थित होते. उंच पुतळ्याला हार घातल्यानंतर ट्रॉली खाली घेण्यात येत होती. मात्र खाली येत असतानाच ट्रॉली हवेतच एका बाजूला कलंडली. ट्रॉली एका बाजूला गेल्याने चौघांचाही तोल गेला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी मोठा अपघात टळला आहे.

हे ही वाचा : मनिष सिसोदिया यांना ‘सर्वोच्च’ दिलासा! जामीन मंजूर, १७ महिन्यांनंतर जेलमधून सुटणार

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल. ९ ऑगस्ट हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे, या दिवशीच महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ‘चले जाओ’ चळवळीचा नारा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच जागतिक आदिवासी दिवस असल्याने ९ ऑगस्टची निवड केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

हे ही वाचा : कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक!

दरम्यान सध्या क्रेनचा वापर सध्या वाढला असून यामध्ये अपघात होण्याची शक्यता असते. क्रेनच्या सहाय्याने हार अर्पण करणे, फुलांची उधळण करणे, मोठमोठाले हार अर्पण करणे याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या