Tuesday, November 19, 2024
Homeराजकीयजयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

परभणी । Parbhanai

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे सगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असताना दुसरीकडे राज्यात जुने पक्ष एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

- Advertisement -

यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. जयंत पाटील यांनी आमदार दुर्राणी यांच्या निवासस्थानी बंद दराआड चर्चा देखील केली. त्यातच आमदार दुर्राणी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ काही दिवसातच संपणार आहे, यामुळे आमदार दुर्राणी आपल्या समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी होणार का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

हे ही वाचा : पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचे पहिल्यांदाच विरोधकांना आवाहन

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ‘राजकारणात काहीही घडू शकते. अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात. त्यामुळे पुढे काहीही घडू शकते, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं होतं.

हे ही वाचा : विद्यार्थ्यांचा भरपावसात जीवघेणा प्रवास

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या