Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनगराध्यक्ष मोरेंना 'जीवन गौरव' पुरस्कार

नगराध्यक्ष मोरेंना ‘जीवन गौरव’ पुरस्कार

सटाणा । प्रतिनिधी Satana

सटाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनिल मोरे यांचा राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याची माहिती निसर्ग मित्र समितीतर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता मालेगाव येथील आयएमए सभागृहात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या आदर्श व्यक्तींना राज्यस्तरीय महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2020 ने सन्मानीत करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्था अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे हे राहणार असून विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, आ.डॉ. सुधीर तांबे, शिक्षक आ. किशोर दराडे, धुळे प्रादेशिकचे सी.एफ. दिगंबर पगार तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील, अतुल निकम, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व पर्यावरण प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या